घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार

गृहमंत्रालयाचा निर्णय; न्या. दिलीप भोसले यांची अध्यक्षपदी नियुक्ती

    11-Jun-2024
Total Views |

Dilip bhosle
मुंबई : घाटकोपर येथे पेट्रोलपंपावर दि. 13 मे रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे या दुर्घटनेची चौकशी होणार आहे.
 
घाटकोपर दुर्घटनेच्या चौकशीत अधिक गतिमानता आणण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचा निर्णय घेतला आहे. सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे या दुर्घटनेची चौकशी होणार आहे. या चौकशी समितीची रचना आणि कार्यकक्षा गृहविभागाकडून निश्चित केली जाणार आहे.