सोन्यात पुन्हा घसरण गुंतवणूकीची सुवर्णसंधी!

एमसीएक्सवरील सोने निर्देशांकात ०.३६ टक्क्यांनी घसरण

    11-Jun-2024
Total Views |

Gold
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस डॉलरमध्ये वाढ होतानाच सोन्याच्या किंमतीत दबाव निर्माण झाला. युएसमधील रोजगार निर्मिती आकडेवारीत अपेक्षेपेक्षा अधिक आकडेवारी आल्यानंतर युएस फेडरल रिझ र्व्ह व्याजदरात कपात होईल ही चर्चा सुरू झाल्याने बाजारात सोन्यात पडझड झाली आहे. चीननेही १८ महिन्यानंतर सोन्याच्या खरेदी थांबल्यानंतर बाजारात सोने स्वस्त झाले.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युएस गोल्ड स्पॉट दरात सकाळी ०.२९ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. देशातील सोन्याच्या एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.३६ टक्क्यांनी घसरण होत सोने ७११ ८३.०० पातळीवर पोहोचले आहे. भारतातील २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ६५२०० रुपयांवर स्थिरावले आहे तर २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ७११८० रुपयांवर पोहोचले आहेत.
 
मुंबईतील सोन्याचे दर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५८५०० तर २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ६३८२० पातळीवर पो होचले आहे. दिल्ली २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५८६५० व २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ६३९७० पातळीवर पोहोच ले आहे.पुण्यातील २२ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ५८५०० व २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ६३८२० रुपयांवर पोहोचले आहेत.
 
आजच्या सोन्याच्या दरातील हालचालींवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे एव्हीपी कमोडिटी रिसर्च कायनात चैनवाला म्हणाले,'उत्साही लेबर अहवालानंतर शुक्रवारी ३.५% पेक्षा जास्त घसरण झाल्यानंतर सोमवारी COMEX सोन्याचे भाव किरको ळ वाढले. डेटा दर्शवितो की यूएस अर्थव्यवस्थेने मे महिन्यात २७२००० नोकऱ्या जोडल्या, एप्रिलमधील सुधारित १६५००० पेक्षा लक्षणीय जास्त आणि अपेक्षित १७५००० पेक्षा जास्त. नवीनतम यूएस नोकऱ्यांचे आकडे फेडला दर कपात करण्यास विलंब कर ण्यासाठी मोकळीक देतात. बाजाराने या वर्षी फेडच्या सुलभतेच्या अपेक्षा कमी केल्या आहेत, गुंतवणूकदारांनी आता सप्टेंबरम ध्ये ५०% कपात होण्याची शक्यता आहे. उद्या यूएस सीपीआय आणि एफओएमसी बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध राहतील. ता जे आर्थिक अंदाज आणि डॉट प्लॉट जवळून पाहिला जाईल.'