मंत्री एस. जयशंकर अॅक्शन मोडवर; शपथविधीनंतर विदेशी प्रमुखांच्या भेटी!

    10-Jun-2024
Total Views |
s jaishankar mets foeign leadersनवी दिल्ली :     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला असून सरकारकडून कामकाजास सुरूवातदेखील झाली आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाहुणे म्हणून उपस्थिती राहिलेल्या विविध देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत. यात बांग्लादेश, श्रीलंका व मालदीव या देशांच्या प्रमुखांशी भेटून चर्चा केल्याचे समोर आले आहे.

 


दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या भेटीवर भाष्य केले आहे. मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांना नवी दिल्लीत भेटून खूप आनंद झाला. भारत आणि मालदीवसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. असे एस जयशंकर यांनी म्हटले आहे.
०९ जून रोजी राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर आज नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्र्यांनी विविध देशांच्या प्रमुखांची भेट घेतली आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री म्हणाले, पंतप्रधान शेख हसीना यांना भेटून उभय देशांत सन्मान व मैत्री दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या भेटीनंतर भारत-श्रीलंका यांच्यातील राजनैतिक संबंधात स्थिरता येण्यास मदत होईल, असेही एस. जयशंकर यांनी सांगितले.