नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते व परिवहन मंत्रालय!

    10-Jun-2024
Total Views |
nitin gadkari raod transportation
 

नवी दिल्ली :    एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. अर्थात हे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नसले तरी याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय अंतर्गत नितीन गडकरी मोदी सरकारच्या मागील दोन कार्यकाळात देशातील रस्ते महामार्गांचे जाळे विस्तारल्याचे पाहायला मिळाले आहे. नितीन गडकरी यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामकाजाकडे पाहता एनडीए सरकारने पुन्हा एकदा रस्ते व परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

०९ जून रोजी राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेते नितीन गडकरी यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर गडकरी यांना पुनश्च केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा सुरू होत्या. आता मोदी सरकारकडून नितीन गडकरी यांच्या मंत्रीपदाबाबत शिक्कामोर्तब करण्यात येत आहे.