जाणून घ्या; मोदी ३.० कॅबिनेट जाहीर!

    10-Jun-2024
Total Views |


nda govt cabinet list
 

मुंबई :      एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. अर्थात हे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले असून याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जगतप्रकाश नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, मनोहर लाल या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रालयपदाची शपथ घेतली. मोदी सरकारमध्ये एकूण ३० कॅबिनेट मंत्रालयअसणार आहेत. त्यामध्ये जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी, हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितनराम मांझी, जनता दल युनायटेडचे राजीव रंजन उर्फ ललन सिंह, तेलुगू देशमचे किंजरापुरा राममोहन नायडू, लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान या मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.कॅबिनेट मंत्रालय

अमित शहा (गृह मंत्रालयव सहकार मंत्रालय)

राजनाथ सिंह (संरक्षण मंत्रालय)

नितीन गडकरी (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)

अश्विनी वैष्णव (रेल्वेमंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय)

जगत प्रकाश नड्डा (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, रसायने व खते मंत्रालय)

शिवराज सिंह चौहान (कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय)

निर्मला सीतारामन (अर्थमंत्रालयव कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय)
 
डॉ. एस. जयशंकर (परराष्ट्र व्यवहार मंत्रालय)

मनोहर लाल खट्टर (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, उर्जा मंत्रालय)

एच डी कुमारस्वामी (अवजड उद्योग मंत्रालयव पोलाद मंत्रालय)

पियुष गोयल (वाणिज्य व उद्योग मंत्रालय)
 
धर्मेंद्र प्रधान (शिक्षणमंत्रालय)

जीतनराम मांझी (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय)

राजीव रंजन सिंग उर्फ ​​ललन सिंग (पंचायत राज मंत्रालय, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय)

सर्बानंद सोनोवाल (बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय)

डॉ. वीरेंद्र कुमार (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय)

किंजरापू राममोहन नायडू (नागरी विमान वाहतूक मंत्रालय)

प्रल्हाद जोशी (ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय)

जुआल ओरम (आदिवासी व्यवहार मंत्रालय)

गिरीराज सिंह (वस्त्रोद्योग मंत्रालय)

ज्योतिरादित्य एम. सिंधिया ( दळणवळण मंत्रालयव ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्रालय)

भूपेंद्र यादव ( पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय)

गजेंद्रसिंह शेखावत (सांस्कृतिक मंत्रालय, पर्यटन मंत्रालय)

अन्नपूर्णा देवी ( महिला व बालविकास मंत्रालय)
 
किरेन रिजिजू (संसदीय कामकाज मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय)

हरदीप सिंग पुरी (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय)

डॉ. मनसुख मांडविया (कामगार व रोजगार मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय)

जी. किशन रेड्डी (कोळसा मंत्रालय, खाण मंत्रालय)

चिराग पासवान (अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय)

सी आर पाटील (जलशक्ती मंत्रालय)