एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत निधन!

    10-Jun-2024
Total Views |
mca president amol kale passed away usaमुंबई :      मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अमोल काळे यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले आहे. इंडिया विरुध्द पाकिस्तान सामना पाहण्यासाठी काळे आपल्या सहकाऱ्यांसोबत अमेरिकेला गेले होते. सामन्यानंतर काळे यांच्या निधनाची दुःखद वार्ता समोर आली असून क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अमोल काळे हे एमसीएचे अध्यक्ष होते त्याचबरोबर, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. काळे यांच्या आकस्मिक निधनामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमोल काळे यांचे सहकारी, क्रीडा पत्रकार, विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला असून अनेकांनी त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला आहे.