मराठमोळ्या जोडीने चाहत्यांना दिली गूड न्यूज, घेतलं हक्काचं घर!

    10-Jun-2024
Total Views |
 
yogita and saurabh
 
 
 
मुंबई : 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांनी ३ मार्च २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. तसं पाहायला गेलं तर दोघांनी त्यांच्या चाहत्यांना लग्नाची आनंदवार्ता देऊन सुखद धक्काच दिला होता खरा. आणि आता लग्नाला दोन महिने झाल्यानंतर योगिता आणि सौरभने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. या दोघांनी मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे.
 
योगिता आणि सौरभने सोशल मिडियावर नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो शेअर केले आहेत. सौरभने या फोटोंना कॅप्शन देत लिहिले आहे की, 'एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया. नवीन शहरात, नवीन संसार थाटूया'.
 

yogita and saurabh 
 
सौरभने घराचे फोटो शेअर करताना पवई लोकेशन मेन्शन केलं असल्यामुळे त्यांचं नवं घर पवईत आहे असं समजतं. योगिता व सौरभच्या या नव्या सुरुवातीला सोशल मीडियावरुन लोकं शुभेच्छा देत आहेत.