शेअर बाजार अपडेट: शपथविधीनंतर सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीमध्ये वाढ

बँक निर्देशांकात वाढ कायम तर मिडकॅप व स्मॉलकॅपमध्येही वाढ

    10-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी ११ वाजेपर्यंत किंचित वाढ झाली आहे. सेन्सेक्स १२०.८२ अंशाने वाढत ७६८११.७६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६२.३५ अंशाने वाढत २३३५२.५० पातळीवर पोहोचला आहे. आठवड्याची सुरुवात दमदार नसली तरी सलग चौथ्यांदा बाजारात वाढ झाल्यानंतर पुन्हा बाजारात वरची पातळी गाठल्या ने बाजारात स्थिरता निर्माण झाल्याचे एकूण चित्र आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात १९५.४८ अंशाने वाढ होत ५६९६२.१७ पातळीवर सेन्सेक्स निर्देशांक पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक ८९.६५ अंशाने वाढत ४९८९२.८५ पातळीवर पोहोचला आहे.बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५९ व १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९ व १.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.निफ्टीमधी ल क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) आयटी (१.७६%) समभाग वगळता इतर समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ मिडिया (१.५१%),पीएसयु बँक (१.४२%) समभागात झाली आहे तर फार्मा (०.८८%), रियल्टी (१.३९%),कनज्यूमर ड्युरेबल्स (०.७७%), हेल्थकेअर (०.६३%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत सकाळच्या सत्रात अल्ट्राटेक सिमेंट,पॉवर ग्रीड, एनटीपीसी, एक्सिस बँक, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, लार्सन, टाटा स्टील, एसबीआय, रिलायन्स, भारती एअरटेल, सनफार्मा, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंटस या समभागात वाढ झाली आहे तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएलटेक, एम अँड एम, टायटन कंपनी, विप्रो, जेएसडब्लू स्टील, टायटन कंपनी, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा आयटीसी, एशियन पेंटस, इंडसइंड बँक या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत सकाळच्या सत्रात अल्ट्राटेक सिमेंट,पॉवर ग्रीड, हिरो मोटोकॉर्प, ग्रासीम, एनटीपीसी, सिप्ला, नेस्ले, ब्रिटानिया, एक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्टस, डिवीज, एनचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, आयशर मोटर्स, रिला यन्स,डॉ रेड्डीज, अदानी एंटरप्राईज, श्रीराम फायनान्स, टाटा मोटर्स,टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक या समभागात वाढ झाली आहे. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएलटेक, विप्रो, टायटन कंपनी, टीसीएस, एचडीएफसी बँक, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, एचयुएल, कोटक महिंद्रा, आयटीसी, इंडसइंड बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स या सम भागात घसरण झाली आहे.
 
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना आर्थिक धोरणे पुढे राहील असे वाटत असल्याने बाजारात वाढ झाली असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात भारतात सकारात्मकता कायम असली तरी अखेरच्या सत्रात बाजारात वाढ कायम राहणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.