शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची सुरुवात थोड्या घसरणीने तरीही बाजारात 'बुलिश' वातावरण कायम सेन्सेक्स २०३.२८ व निफ्टी ३०.९५ अंशाने घसरला

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम तर आयटी समभागात घसरण

    10-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज आठवड्याची सुरुवात घसरणीवर झाली आहे. सकाळच्या सत्रात बाजारात थोडीशी वरची पातळी गाठली असली तरी अखेरच्या सत्रात बाजारात काहीशी खालची पातळी गाठत बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०३.२८ अंशाने घसरण झाली असून निर्देशांक ७६४९०.०८ पातळीवर पोहोचले आहे.निफ्टी ५० निर्देशांकात ३०.९५ अंशाने घसरण होत २३२५९ .२० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६६.४२ अंशाने वाढत ५६८३३.११ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २७.५५ अंशाने वाढत होत निर्देशांक ४९८३०.७५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६६ व १.०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०८ व १.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक वाढ मिडिया (१.७७%), फार्मा (०.८९%), पीएसयु बँक (०.६१%), हेल्थकेअर (०.४७%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.६५%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी (१.८७%), मेटल (०.५१%), प्रायव्हेट बँक (०.२६%),फायनांशियल सर्विसेस (०.२३%), तेल गॅस (०.२६%) समभागात घसरण झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ४१२३ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २६०५ समभागात वाढ झाली आहे तर १३९१ समभागात घसरण झाली आहे. आज ३१४ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १९३ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ४४६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १९७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७९२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७४१ समभाग वधारले असून ९६१ समभागात घसरण झाली आहे. १७८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १६ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. १७८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५६ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज बीएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२४.९१ लाख कोटी रुपये होते तर एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४२०.१४ लाख कोटी रुपये होते. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने रुपयांची प्रति डॉलर किंमत ८३.५० रुपयांवर पोहोचली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील अपेक्षित आकड्यांपेक्षा रोजगार आकडे वारी आल्यानंतर बाजारातील डॉलर वधारला होता तसेच चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने सतत सोन्याच्या खरेदीनंतर १८ महिन्यांनी खरेदीला पूर्णविराम दिल्याने बाजारातील मागणीत घट झाली होती. युएस मध्ये युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपा त होण्याची आशा निर्माण झाल्याने सोने निर्देशांक दुपारपर्यंत खालावला होता. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड स्पॉट दरात ०.०९ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.५१ टक्क्यांनी घसरण झाली होती. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०३ टक्क्यांनी घसरण झाली होती.
 
दुपारपर्यंत महत्वाच्या भारतीय शहरात सोन्याच्या दरात न बदल होता 'जैसे थै 'होते. संध्याकाळपर्यंत २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरातही कुठलाही बदल झालेला नाही. भारतात सरासरी २२ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅम दर ६५७०० व २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ७१६७० रुपयांवर स्थिरावले होते.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सकाळपर्यंत वाढ झाली होती. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली गेल्याने बाजारात पुन्हा भाव वधारले होते. दुसरीकडे रोजगार निर्मिती आकड्यात वाढ दर्शविली गेल्यानेही युएस शमध्ये क्रूड तेजीचे वातावरण कायम असल्याचे पहायला मिळत होते. संध्याकाळपर्यंत कच्च्या (Crude) तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent निर्देशांकात ०.१६ टक्क्यांनी वाढ झाली होती. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.०२ टक्क्यांनी संध्याकाळपर्यंत घसरण झाली होती. तसेच ओपेक राष्ट्रांकडडून आगामी तेलाच्या उत्पादनात कपात करण्याची शक्यता असल्यानं बाजारातील मागणीत वाढ झाली होती ज्याचा परिणाम आशियात होऊन तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
 
आज शेअर बाजारात 'बुलिश' वातावरण कायम राहिले असले तरी निर्देशांकात मात्र किंचित घसरण झाली आहे. सलग चार वेळा बाजारात वाढ झाल्यानंतर 'कंसोलिडेशन ' मध्ये बाजार गेले आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाजारातील आगामी काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवले असले तरी आय आठवड्यातील युएस फेडरल रिझर्व्ह बैठकीत काय निकष प्रस्तुत केले जातात यावर अर्थतज्ज्ञांचे लक्ष लागलेले आहे.अमेरिकन पेरोल (रोजगार निर्मितीचे) आकडे सकारात्मक आल्याने बाजारात तेजी पहायला मिळाली असली तरी महागाईचे आव्हान कायम आहे.अनेक युएस बाजारातील तज्ञांनी महागाई नियंत्रणात न राहि ल्यास दर कपातीत विलंब होऊ शकतो असेही म्हटले आहे.
 
फ्रान्समधील अध्यक्षांचे धक्कादायक पुन्हा निवडणूक घेणार असल्याचे विधान ऐकताच युरोपातील बाजारात 'हिरमोड' झाला होता.त्याचाही परिणाम आशिया बाजारात झाला होता. जागतिक स्तरावर संमिश्र प्रतिसाद असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.मात्र गठबंधन सरकारच्या काळात लोकप्रिय योजनेची तरतूद केल्यास यावर गुंतवणुकदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया येऊ शकतात.मात्र सरकारकडून यापूर्वीच्या सग ळ्या आर्थिक धोरणाची अंमलबजावणी व पुनरावृत्ती केली जाण्याची शक्यता असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितल्याने मूलभूत सु विधा, उत्पादन, भांडवली खर्च या गोष्टीत सरकारचा प्राधान्यक्रम असल्याने स्थिरताही मिळू शकते.
 
तसेच बाजारातील बुलियन अंडरकरंट कायम राहताना मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ झाली होती तर निफ्टी बँक निर्दे शांकात वाढ झाल्याने बाजारातील घसरण मर्यादित पातळीवर राहिली आहे. काही मुख्य लार्जकॅपमध्ये आज घसरण झाल्याने बाजारात रॅली होऊ शकली नाही. आयटी समभागात घसरण तर रियल इस्टेट क्षेत्रातील समभागात वाढ झाल्याने बाजारात जवळपास 'इक्विलिब्रियम ' गाठले गेले आहे.
 
बीएसईत सर्वाधिक वाढ नॅशनल फर्टीलायझर (११.६६%), रॅलीस इंडिया (११.२८%), टिटागढ रेल सिस्टीम (११.०५%), डेटा मेटिक्स (१०.८७%), रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (१०.६७%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक नुकसान आयआरबी(६.९८%), पुनावाला (८.३८%), सुझलोन (२.४९%), युरेका फोर्ब्स (४.२६%) कोफोर्ज (३.८९%) झाला आहे.एनएसईत सर्वाधिक वाढ अल्ट्राटेक सिमेंट (३.२६%), ग्रासीम (२.४३%), हिरो मोटोकॉर्प (२.३०%), सिप्ला (२.१२%),पॉवर ग्रीड (२.०९%) वाढ झाली आहे तर घसरण टेकएम (२.६६%), इन्फी (२.३१%) , विप्रो (१.८८%), बजाज फायनान्स (१.५३%) समभागात घसरण झाली आहे
 
आज बीएसईत अल्ट्राटेक सिमेंट,पॉवर ग्रीड,नेस्ले, एक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, एशियन पेंटस, एसबीआय, लार्सन, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह या समभागात झाली आहे तर घसरण टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एम अँड एम, बजाज फायनान्स, टीसीएस, एचसीएलटेक, मारूती सुझुकी, टायटन कंपनी, आयटीसी, एचयुएल, कोटक महिंद्रा, भारती एअरटेल या समभागात झाली आहे.
 
एनएसईत अल्ट्राटेक सिमेंट, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, पॉवर ग्रीड, नेस्ले, एनटीपीसी,एचडीएफसी लाईफ, एक्सिस बँक, श्रीराम फायनान्स, टाटा स्टील, डॉ रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स, बीपीसीएल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशर मोटर्स, जेएसडब्लू स्टील, सनफार्मा, लार्सन, डिवीज, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स,बजाज ऑटो, अदानी एंटरप्राईज या समभागात वाढ झाली आहे. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एम अँड एम, बजाज फायनान्स, टीसीएस, एचसीएलटेक, मारूती सुझुकी, टायटन कंपनी, हिंदाल्को, आयटीसी, एचयुएल, कोल इंडिया, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
 
आज शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले,' आज,बेंचमार्क निर्देशांकांनी अरुंद श्रेणीतील क्रियाकलाप पाहिला, निफ्टी 31 अंकांनी कमी झाला तर सेन्सेक्स 203 अंकांनी खा ली आला.क्षेत्रांमध्ये, वास्तविकता आणि मीडिया निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले तर आयटी निर्देशांक 1.84 टक्क्यांनी घस रला.तांत्रिकदृष्ट्या, दिवसभर सकारात्मक सुरुवात झाल्यानंतर बाजार २३२३० ते २३४००/७६४००-७७००० दरम्यान घसरला.
 
मजबूत रॅलीनंतर इंट्राडे रेंज बाउंड ॲक्टिव्हिटी आणि दैनंदिन चार्टवर लहान मंदीची मेणबत्ती बुल आणि बिअर यांच्यातील अनिर्णय (अनिश्चितता) दर्शवते. दिवसाच्या व्यापाऱ्यांसाठी, २३४००/७७००० ही तात्काळ प्रतिकार पातळी असेल. जोपर्यंत बाजार समान खाली व्यवहार करत आहे, तोपर्यंत करेक्शन फॉर्मेशन चालू राहण्याची शक्यता आहे. त्याच खाली, बाजार २३१००-/२३ ०२५/७६१००-७६००० पर्यंत घसरू शकतो. उलटपक्षी, २३४००/७७००० ब्रेकआउटनंतर निर्देशांक २३५००-२३५२० /७७३०० -७७४०० पर्यंत जाऊ शकतो.कॉन्ट्रा ट्रेडर्स २३०२५/७६००० जवळ ३०/१०० पॉइंट्सच्या स्टॉप लॉससह लाँग बेट घेऊ शकतात.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय तणावामुळे, देशांतर्गत बाजार आज लाल रंगात होता आणि मजबूत अमेरिकन कामगार बाजार डेटामुळे, गुंतवणूकदारांनी या वर्षी फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा कमी केली. फ्रान्समध्ये स्नॅप निवडणुकीच्या घोषणेमुळे निर्माण झालेल्या व्यापक राजकीय अडचणींबद्दलच्या चिंतेचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी सावध गुंतवणूक धोरण स्वीकारले. बिडींगच्या पहिल्या दिव शी Le Travenues टेक्नॉलॉजी जे ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म ixigo चालवते, त्यांना इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी १.३१ पट सबस्क्रिप्शन मिळाले. ऑफरवर ४.३७ कोटी शेअर्सच्या तुलनेत ५.७ कोटी शेअर्ससाठी बिड मिळाले. सार्वजनिक इश्यूचे स दस्यत्व घेण्यात आले.किरकोळ श्रेणीत ४.४५ पट, आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIS) श्रेणीमध्ये १.५४ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (QIBs) भागाने ०.११ टक्के बुकिंग केले.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' केंद्रात नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भारतीय बाजारपेठेत सध्या नवीन उत्प्रेरकांचा अभाव आहे, जे सूचित करते की नजीकच्या काळा त काही एकत्रीकरण होऊ शकते. संस्थात्मक प्रवाह संमिश्र कल दर्शवितात, FII हळूहळू त्यांचे शॉर्ट्स कव्हर करतात आणि DII मार्केट नंतर नफा बुक करतात. ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले,' एका व्यस्त आठव ड्या नंतर ब्रेक घेत बाजार कमी झाला आणि थोडा कमी झाला. बेंचमार्क आघाडीवर, निफ्टी थोड्या वाढीसह उघडला आणि २३ २५९.२० वर बंद होण्यापूर्वी एका अरुंद श्रेणीत चढ-उतार झाला. दरम्यान, क्षेत्रांमधील संमिश्र प्रवृत्तीने व्यापाऱ्यांना गुंतवून ठेव ले, रिॲल्टी आणि फार्मा हे टॉप गेनर्स म्हणून उदयास आले, तर आयटी आणि धातू लाल रंगात संपले. उल्लेखनीय म्हणजे,स्मॉलकॅप निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला, ज्याने प्रगतीच्या बाजूने मजबूत बाजार रुंदीला हातभार लावला.गेल्या आठवड्यात अत्यंत चढउतार अनुभवल्यानंतर निफ्टीने सध्याच्या पातळीच्या आसपास काही वेळ घालवला तर ते निरोगी आहे असे आम्हाला वाटते. दरम्यान, सर्व क्षेत्रे आवर्तनाच्या आधारावर वाटचाल करण्यासाठी योगदान देत असल्याने, स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित केले पाहि जे आणि दर्जेदार नावे जमा करण्यासाठी एकत्रीकरणाचा वापर करावा.'
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन एनडीए सरकारविषयी प्रतिक्रिया देताना ऑल कार्गो समुहाचे संस्थापक व चेअरमन शशी शेट्टी म्हणाले, ' सुदृढ मॅक्रो-इकॉनॉमिक परिस्थिती, कॉर्पोरेट कमाई आणि मजबूत देशांतर्गत मागणी यांच्या आधारावर अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. सरकारचा तिसरा कार्यकाळ म्हणजे पायाभूत सुविधां च्या विकासात आणि गंभीर सुधारणांमध्ये धोरणात्मक सातत्य असेल. नवीन सरकार कॅपेक्स गती कायम ठेवेल आणि व्यवसाय उद्दिष्टे आणि वित्तीय एकत्रीकरण यावर लक्ष केंद्रित करेल अशी आमची अपेक्षा आहे.ज्या वेळी डिजिटल अर्थव्यवस्था नवीन उपभोगाच्या सीमा उघडत आहे, जागतिक कंपन्या भारतात उत्पादन तळ स्थापन करत आहेत आणि राष्ट्र जागतिक मूल्य शृंखलेत आपला दावा करत आहे,सुविधा देणारा एक दोलायमान आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक उद्योग वाढीचा गुणक आणि व्यापार म्हणून काम करेल.
 
आमचा ठाम विश्वास आहे की देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांद्वारे भारतात उत्पादन करणे हा एक कार्यक्षम लॉजिस्टिक इकोसिस्टमच्या आधारे घेतलेला निर्णय आहे जो देशांतर्गत आणि सीमापार मागणी पूर्ण करू शकतो. आर्थिक वाढीचा अजेंडा पु ढे नेणाऱ्या मोठ्या जागतिक लॉजिस्टिक कंपन्या तयार कराव्या लागतील.भारतीय लॉजिस्टिक कंपन्या जागतिक स्तरावर पद चि न्ह निर्माण करणे ही विकसित राष्ट्राची गरज आहे -विकसित भारत @ 2047. मला खात्री आहे की सरकार दखल घेईल आणि भारतीय लॉजिस्टिक कंपन्यांना जागतिक स्तरावर त्यांच्या उदयास सक्षम करण्यास सक्षम करेल.'