सिद्धार्थ जाधवचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान! मराठी कलाकारांनी केला कौतुकाचा वर्षाव

    10-Jun-2024
Total Views |
 
siddharth jadhav
 
 
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव याने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या आजवरच्या कामगिरीसाठी सिद्धार्थचा राष्ट्रीय स्तरावर एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये सिद्धार्थला ‘बालभारती’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा ज्युरी विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
 
सिद्धार्थ जाधवचा राष्ट्रीय स्तरावर एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये सिद्धार्थला ‘बालभारती’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा ज्युरी विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
 
सिद्धार्थने पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले आहे. सिद्धार्थ म्हणाला आहे की, “BEST ACTOR (JURY ) बालभारती
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये आमचा सिनेमा ‘बालभारती’ यासाठी मला जुरींकडून ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ हा पुरस्कार मिळाला…
 
मनापासून आनंद होतो… ‘बालभारती’ सिनेमातल्या माझ्या कामाचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक केलं जातंय… काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे… देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी award मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे… आमचे producer @official_sphereorigins
सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो मी आमचे दिग्दर्शक लेखक @nitinnandan… लव्ह यू टीम!”
 
 siddharth jadhav