पेटीएममध्ये मोठी कर्मचारी कपात

पुनर्रचनेचा भाग म्हणून कंपनीचा मोठा निर्णय

    10-Jun-2024
Total Views |

Paytm
 
 
मुंबई: फिनटेक कंपनी One 97 Communications म्हणजेच पेटीएम कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने हे पाऊल उचलले घेल्याचे कंपनीच्या वतीने निवेदनात सांगण्यात आले आहे. पेटीएम ब्रँडला आरबी आयच्या दंडात्मक कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या सेवा सुविधा बंद कराव्या लागल्या होत्या.
 
यामध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर मार्च २०२४ पर्यंत कंपनीने आपल्या सेल्स विभागातील ३५०० ते ३६५२१ कर्मचाऱ्यांची कपात केली होती. परंतु पेटीएमने आपल्या काढलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीत संधी मिळावी यासाठी प्लेसमेंट सपोर्ट देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अनेक कंपनीशी हातमिळवणी करत कंपनी यांना सहाय्य करणार आहे.
 
कंपनीने आपल्या कंपनीत फेरबदल करण्यासाठी तसेच सेवेवरील खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला. कंपनीच्या माहितीप्रमाणे पेटीएमने कर्मचारी शोधणारे ३० कंपन्यांशी हातमिळवणी करत काढलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे असे सांगितले आहे. आर्थिक वर्ष जानेवारी मार्च २०२४ मध्ये कंपनीला ५५० कोटींचे नुकसान झाले आहे. तर त्या आधीच्या वर्षातील सारख्या तिमाहीत कंपनीला १६७.५ कोटींचे नुकसान झाले आहे.
 
कंपनीच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, 'FY24 कमाईच्या रिलीझचा एक भाग म्हणून, One97 कम्युनिकेशन्सने सांगितले की ते त्याच्या नॉन-कोर व्यवसाय लाइन्सची कपात करणार आहे, आणि AI-नेतृत्वाच्या हस्तक्षेपांद्वारे एक दुबळी संस्था संरचना राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवतील. कंपनी आपल्या मार्गदर्शनात नफा वाढवण्याच्या दिशेने सक्रियपणे काम करत आहे.' असे म्हटले आहे.