नुपूर शर्मा यांचे २ वर्षानंतर सोशल मीडियावर पुनरागमन; पहिल्याच पोस्टमध्ये म्हणाल्या, "पुन्हा एकदा..."

    10-Jun-2024
Total Views |
 Nupur Sharma
 
नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दोन वर्षानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 'सर तन से जुदा' गँग मागे पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नव्हती, परंतु आता मोदी ३.० च्या पुनरागमनानंतर त्यांनीही सोशल मीडियावर देखील पुनरागमन केले आहे. नुपूर शर्माने त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
 
नुपूर शर्मा यांनी पंतप्रधान मोदींची शपथ घेतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. नूपुर शर्मा एक्सवर लिहिले की, 'आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींना आज तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताना पाहून खूप आनंद झाला. मोदी सरकार पुन्हा एकदा सुरक्षित आणि विकसित भारताच्या दिशेने. नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेट शो दरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यांच्या याचं वक्तव्याची एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.
  
या वादामुळे भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. या वादानंतर नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यांच्या जीवाला धोका लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती, तेव्हापासून त्या कडक सुरक्षेत राहतात. मात्र, दि. २५ मे २०२४ रोजी दिल्लीतील लोकसभा निवडणुकीदरम्यान नुपूर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आल्या होत्या. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी मतदान केले होते. त्यांचे सोशल मीडियावरील पुनरागमन त्यांच्या समर्थकांसाठी आनंदाची बातमी आहे.