राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन! दोन्ही गटांकडून मेळाव्याचं आयोजन

    10-Jun-2024
Total Views |
 
Ajit Pawar & Sharad Pawar
 
मुंबई : सोमवार, १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून हा दिवस साजरा केला जाणार आहे. पक्षफूटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
हे वाचलंत का? -  "राष्ट्रवादीला आम्ही ऑफर दिली पण..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज पहिलाच वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून अहमदनगरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर दुसरीकडे, अजित पवार गट मुंबईमध्ये आपला वर्धापन दिन साजरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहनही करण्यात आलं आहे. दरम्यान, या दोन्ही गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.