३० कोटींचे बजेट असलेल्या ‘मुंज्या’ने कमावला कोटींचा गल्ला

    10-Jun-2024
Total Views |
 
munjya
 
 
मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' चित्रपट सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. शिवाय बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील तुफान झाले असून प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट असून ती लेगसी या चित्रपटाने देखील कायम ठेवली याचा विशेष आनंद आणि कौतुक आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसची कमाई समोर आली आहे.
 
'मुंज्या' या चित्रपटाने पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४ कोटी, दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटी, तिसऱ्या दिवसी ८ कोटी कमवत आत्तापर्यंत केवळ तीन दिवसांत १९.२५ कोटी कमावले आहेत.
 
 
 
या चित्रपटात मोना सिंग, शर्वरी वाघ, अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असून सुहास जोशी, अजय पुरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे यांच्याही महत्वपुर्ण भूमिका आहेत. ‘मुंज्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ३० कोटी रुपये खर्च केले होते. आणि आता केवळ तीन दिवसांत यशस्वीपणे बजेटच्या निम्म्याहून जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे.