‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये; शोधा....

    10-Jun-2024
Total Views |

Mirzapur 3 
 
 
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिर्झापूर ३ कधी येणार याची उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वीच कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता. पण आता ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून एका कोड्यातून ती प्रेक्षकांनीच ओळखावी अशी वेगळी शक्कल लढवण्यात आली आहे.
 
 काही दिवसांपूर्वी ‘कोटा फॅक्ट्री सीझन ३’ वेब सीरिजची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी देखी एक खेळ खेळण्यात आला होता. असंच काहीसं ‘मिर्झापूर’च्या निर्मात्यांनीही केलं आहे.
 
‘प्राइम व्हिडीओ’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला असून यात ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडली आहे. या फोटोच्या वरती लिहिलं आहे, “‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख यात दडली आहे. सापडत असेल तर शोधा.”
 

Mirzapur 3 
 
‘प्राइम व्हिडीओ’नं शेअर केलेला फोटो पाहून अनेकांनी ‘मिर्झापूर ३’ सीरिज ७ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “७ जुलै. कारण फोटोमध्ये जितक्या गोष्टी आहेत, त्या ७ आहेत. जसे की डिम्मीच्या हाताची बोटं, मुन्नाच्या शर्टची बटणं, बंदूक, पेन्सिल, लोकं, कापरेट इत्यादी सर्वकाही ७ आहेत.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “गाडीच्या नंबर प्लेटवर ७ लिहिलं आहे. ७ बंदूक, ७ लोकं, ७ कारपेट आहे. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख ७ जुलै आहे.” पण आता नेटकऱ्यांनी लावलेला हा अंदाज कितपत खरा आहे? हे लवकरच स्पष्ट होईल.