वीज पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

चार दुभच्या म्हशींचा मृत्यु तर दोन गाई जखमी पेंढा, खुराक आगीत जळुन भस्मसात

    10-Jun-2024
Total Views |

वीज पडल्याने  
 शहापुर: शहापुर तालुक्यात काल मान्सुन च्या पाऊसाला सुरुवात झाली आहे. कडाक्याच्या विजांसहित जोरदार वादळी पावसाने अचानक धुमाकुळ घातल्यामुळे शहापुर तालुक्यात अनेकांचे नुकसान झाले आहे. यात खैरे येथिल शेतकर्याच्या बेडेघरावर विज कोसळल्याने लागलेल्या आगीत चार म्हैशीचा होरपळुन मृत्यु झाला आहे तर दोन गाई गंभिर पण भाजल्या आहेत.
 
काल पहाटे पासुन शहापुर तालुक्यात मान्सुन चा पाऊस दाखल झाला, त्यात रात्रीच्या सुमारास विजेच्य गडगटासह मुसळधार पावसामुळे शहापुर येथील शेणवे विभागातील खैरे गांवात अरुण राघो दिनकर यांच्या बेडे घरावर विज पडून आग लागली या आगीत त्यांच्या 4 दुभत्या म्हशीचें होरपळून मृत्यु पावल्या तसेच आगीमध्ये 3/4 हजार पेंढ्यांचे भारे, जनावरांचा खुराक व एक बैलगाडी जाळून खाक झाली तर व 2 गायी गंभिर रित्या जखमी झाल्या आहेत.
 
यामुळे या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामुळे संपुर्ण परीसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आजित पवार गटाचे स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी या घटनास्थळी पाहनी करुन सदर शेतकर्याला अर्थिक मदत करुन महसुल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.