पुढील मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला संधी

देवेंद्र फडणवीस यांची माहिती; राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराची ऑफर नाकारली

    10-Jun-2024
Total Views |

Devendra fadanvis
 
 मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, अजित पवार यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचे अभिनंदन करतो. नितीन गडकरी, पीयूष गोयल पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत.
 
रामदास आठवले हेदेखील शपथ घेणार आहेत. रक्षाताई खडसे, मुरलीधर मोहळ हेदेखील मंत्रिमंडळात सहभागी होत आहेत. विदर्भातून प्रतापराव जाधव यांच्या अनुभवी माणूस हेदेखील मंत्रिमंडळात येत आहेत.” “राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्यावतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांचा आग्रह होता. की, प्रफुल्ल पटेल यांचे नाव फायनल आहे आणि ते मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही.
 
जेव्हा आघाडीचे सरकार असते, त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात. कारण अनेक पक्ष सोबत असतात. त्यामुळे एका पक्षासाठी निकष मोडता येत नाहीत. पण, भविष्यात जेव्हा विस्तार होईल तेव्हा विचार,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “आता समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण आम्हाला राष्ट्रवादीने सांगितले आम्हाला पुढच्या वेळेस दिले तरी चालेल, पण आम्हाला मंत्रिपद द्या,” असा खुलासा देखील फडणवीसांनी केला.
 
अजित पवार यांचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी एनडीएच्या बैठकांना मला जाता आले नाही. त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पाठवले होते. आमची राजनाथ सिंह, अमित शाह यांच्याशी बैठक झाली होती. महाराष्ट्रातील निकालाबाबत त्यावेळी चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना विनंती केली होती की, संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या चार होणार असल्याने आम्हाला एक मंत्रिपद मिळावे. त्यांनी ठीक आहे म्हटले. त्यानंतर त्यांचा आम्हाला मेसेज आला की, एका सदस्याला संधी देण्यात येईल.
 
प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे राज्यमंत्रिपद स्वतंत्र प्रभार स्वीकारणे आम्हाला योग्य वाटले नाही. म्हणून आम्ही थांबवण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. पण आम्हाला केंद्रीय मंत्रिपद हवे आहे, असे कळवले. त्यानंतर त्यांनी जी ऑफर दिली होती, ती आम्ही नाकारली, असा खुलासा अजित पवार यांनी केला.