मोठी बातमी: पंतप्रधान होताच शेतकऱ्यांसाठी मोदींचा मोठा निर्णय ! म्हणाले, ' शेतकरी..

किसान सम्मान योजनेचे सरकारकडून विस्तारीकरण

    10-Jun-2024
Total Views |

farmer
 
मुंबई: पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावरच सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. सत्तेत आल्यावरच लगेच शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना पारित केली आहे. या योजनेतून ९.३ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. १७ हप्त्यात या २०००० कोटींची योजना असणार आहे.
 
आर्थिकदृष्ट्या मागास व कमजोर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होताना प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला ६००० रुपये मिळणार आहेत. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत हे पैसे विभागून मिळणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (DBT) माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्यांदा हा निर्णय घेतला आहे
 
'आमचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी संपूर्ण प्रतिबद्धता ठेवणारे सरकार आहे. त्यांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव काम करणार असुन आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊ' असे म्हटले आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या शपथविधीनंतर तत्काळ शेत कऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मोदींनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.