टीडीपीच्या नेत्याची वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून हत्या!

    10-Jun-2024
Total Views |
Andhra Pradesh News


आंध्र प्रदेश:
तेलगू देसम पार्टीचे नेते गौरीनाथ चौधरी यांची कुरनूल जिल्ह्यातील वेलदुर्थी मंडल येथे वायएसआर काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने क्रूरपणे हत्या केली. ही घटना बोमीरेड्डीपल्ले गावात घडली. जिथे तेलगू देसम पार्टीच्या गौरीनाथ चौधरी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालेला असून परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

कर्नूलच्या एसपींनी गावाला भेट दिली असून रहिवाशांना सुरक्षेच्या उपाययोजनेची हमी दिलेली आहे. यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात बंदोबस्तही ठेवला आहे. या हत्येकडे राजकीय हेतूने प्रेरित हल्ला म्हणून पहिले जात आहे, कारण पीडित हा या भागातील एक प्रमुख टीडीपी नेता होता. राजकीय मुद्यावरून ही हत्या झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर सर्कल इन्स्पेक्टर आणि उपनिरीक्षकांना व्हीआर येथे पाठवण्यात आले.