लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोल : जनतेचा कौल नेमका कुणाला?

01 Jun 2024 18:18:46
loksabha election 2024 exit polls



मुंबई :      लोकसभा निवडणूक २०२४ करिता अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले असून येत्या ४ जूनला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज समोर येणार आहे. सायंकाळी ६:३० नंतर एक्झिट पोल स्पष्ट होतील. त्यानुसार, लवकरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात नेमकी बाजी कोण मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, २०१९च्या निवडणुकीच्या एक्झिट पोलवर नजर टाकी तर इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाने एनडीएला ३३९-२६५, युपीएला ७७-१०८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर सीव्होटरने एनडीएला २८७ व युपीएला १२८ जागांचा अंदाज व्यक्त केला होता. तर प्रत्यक्ष निकाल जेव्हा जाहीर झाला, तेव्हा एनडीएला ३५३ व युपीएला ९१ जागा मिळाल्या होत्या.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का, भाजपा ४०० चा आकडा पार करणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. टाईम्स नाउ ईटीजी, रिपब्लिक मॅट्रिझ, अॅक्सिस-आजतक, एबीपी-सीव्होटर, न्यूज २४-चाणक्य लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोल सादर करतील. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ जागांसाठी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे.

एकूण सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आता उत्सुकता एक्झिट पोलची असणार आहे. लवकरच एक्झिट पोलचा अंदाज समोर येईल. त्यानंतर एनडीए व इंडी आघाडीत जनतेचं कौल नेमकं कुणाला असेल याबाबत अंदाज व्यक्त केला जाईल. एकंदरीत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.


Powered By Sangraha 9.0