सुभाष गाडे, पुंडलिक गाडे यांच्या म्हणण्यानुसार १९६८ पासून शेतजमीन आपल्या मालकीची असून वडिलोपार्जित ते कसत आले आहेत. शेतजमिनीचे मुळ कागदपत्र आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेताचा शेतसारा व पाणीपट्टी देखील भरत आले आहेत. ४ मे रोजी सांडू नसिर शेख याने सहकुटुंब रात्री शेत नांगरून त्यावर १० बाय १० चे शेड उभे केले आणि त्यावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवले.
आपल्या आजोबांची जमीन असल्याचा दावा सध्या सांडू नसिर शेख यांनी केला आहे. जे आतमध्ये येतील त्यांना मारू अशी धमकीदेखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे कुटुंबाला धोका असल्याची रितसर तक्रार गाडे कुटुंबीयांकडून कोपरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.