AIचा वापर करुन लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजात नाटकाची अनाऊन्समेंट!

    09-May-2024
Total Views |

laxmikant berde 
 
 
मुंबई : AI या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन लवकरच अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे लक्ष्मीकांत (Laxmikant Berde) यांना परत आणणार असल्याचे महाएमटीबीच्या Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्टमध्ये कोठारे म्हणाले होते. त्यापुर्वी आज्जीबाई जोरात या नाटकाची अनाऊंसमेंट AI चा वापर करुन लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजातून (Laxmikant Berde) करण्यात आली आहे. त्यामुळे या नाटकाची चर्चा आहे. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच AI चा प्रयोग झाला आहे. दरम्यान, आज्जाबाई जोरात या महा बालनाट्याच्या निमित्ताने अभिनेता अभिनय बेर्डे यांने रंगभूमीवर पदार्पण केले आहे. अभिनय बेर्डे सोबत या नाटकात निर्मिती सावंत देखील आहेत.
 
AI च्या माध्यमातून पुन्हा लक्ष्मीकांत बेर्डे साकारणार- महेश कोठारे
 
लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत आजवर महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट केले. 'धुमधडाका', 'दे दणा दण', 'थरथराट'. पण आता पुन्हा एकदा लक्ष्या सोबत काम करणार असं म्हणत महेश कोठारे म्हणाले की, “लक्ष्मीकांत बेर्डेसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. आणि AI च्या माध्यमातून मला लक्ष्मीकांत बेर्डेला रिक्रिएट करायचं आहे. आणि ती इच्छा मी पुर्ण करुन दाखवणारच”, असं म्हणत लक्ष्मीकांत बेर्डेला मी पुन्हा आणणार असे ठाम विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केला.