संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल! तात्काळ अटकेची मागणी

    09-May-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
छत्रपती संभाजीनगर : संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. तसेच राऊतांना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्याचीही मागणी केली आहे. या वाचाळ व्यक्तीच्या विरोधात ताबडतोब कारवाई करावी आणि त्यांच्या वाचेला लगाम घालण्यास सांगावं, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही प्रमोद राठोड यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या निंदनीय वक्तव्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे सिद्ध झाले असल्याचेही ते म्हणाले आहेत.