आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार असं लिहायला हवं : निरुपम

    09-May-2024
Total Views |

Sanjay Nirupam & Aditya Thackeray 
 
मुंबई : आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहायला हवं, असा घणाघात शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. उबाठा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली होती. यावर आता निरुपम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
"गद्दार हा गद्दारच राहणार. मेरा बाप गद्दार है, हे श्रीकांत शिंदेंच्या माथ्यावर लिहिलेलं आहे," असं वादग्रस्त वक्तव्य उबाठा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावरून संजय निरुपम यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
 
हे वाचलंत का? -  संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल! तात्काळ अटकेची मागणी
 
संजय निरुपम म्हणाले की, "शिवसेनेच्या महिला खासदाराने केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आणि अपमानजनक आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल शिंदे परिवाराची माफी मागायला हवी. ज्याप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीधर्माचे पालन न करता काँग्रेससोबत यूती केली त्यामुळे ते महागद्दार आहेत. याच आधारे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर 'मेरा बाप महागद्दार है' असं लिहायला हवं," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "२०१९ च्या निवडणूकीमध्ये तुम्ही भाजपबरोबर उभं राहून लोकांची मतं मागितली आणि निकाल आल्यावर यूती तोडून खुर्चीच्या लालसेपोटी तुम्ही काँग्रेससोबत यूती केली. ही तुमची महागद्दारी आहे. ही तुमच्या मतदारांशी, महाराष्ट्राच्या नागरिकांशी आणि हिंदुत्त्वाशी गद्दारी आहे. काँग्रेससोबत कधीही जाणार नाही असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सतत बोलायचे. जर कधी गेलो तर माझं दुकान बंद करेन असं त्यांनी म्हटलं होतं," असेही ते म्हणाले.