केवळ सलमानच नव्हे तर आणखी दोन कलाकार होते रडारवर; बिश्नोईला पाठलेले व्हिडिओ

    09-May-2024
Total Views |
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
 

salman khan  
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेन्टवर (Salman Khan) झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरीला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. या पाचव्या आरोपीच्या चौकशीदरम्यान सलमान (Salman Khan) सोबत आणखी दोन कलाकार देखील रडावर होते असल्याचे समोर आले आहे.
 
दरम्यान, सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितले की, राजस्थानमधून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याने अभिनेता सलमान खानसह इतर दोन कलाकारांच्या घरांचीही तपासणी केली होती अशी माहिती दिली. तसेच, गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल याने हल्लेखोरांना आपल्या बोलण्यातून फसवले असून तुम्ही उदात्त काम करणार आहात आणि त्या कामाचे खूप चांगले फळ मिळेल. या हल्ल्यानंतर नावासोबतच चांगले पैसेही मिळतील असे अनमोलने आरोपींना सांगितले असल्याचे तपासातून समोर आले आहे.
 
सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधल्या घराच्या दिशेनं झालेल्या गोळीबार प्रकरणातला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीच्या चौकशीतून उघडकीस आलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या रडारवर फक्त सलमान खानच नाही तर बॉलिवूडचे इतरही कलाकार होते. मोहम्मद रफिक चौधरीच्या मोबाईलमधून सलमान खानच्या घरासोबतच इतरही कलाकारांच्या घराचे व्हिडिओ सापडले असून मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली नाहीत.
 
ततेस, मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२४ रोजी पनवेलमध्ये हल्लेखोरांपर्यंत शस्त्र पोहचवले होते. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलने त्यांना टार्गेटची माहिती दिली होती. तर, आत्महत्या केलेला आरोपी अनुज थापन आणि सोनू विष्णोईने शस्त्रे दिल्यानंतर अनमोलने शूटर्सना सलमानच्या घरावर गोळीबार करण्याची सूचना दिली होती. तोवर हल्लेखोरांना कोणावर गोळ्या चालवायच्या आहेत, याचीही कल्पना नव्हती.