Q4 Results: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयची आर्थिक स्थिती भक्कम , निव्वळ नफा २०६९८ कोटींवर , एनपीएत मोठी घट

बँकेच्या संचालक मंडळाने प्रति समभाग १३.७० लाभांश सुचवला

    09-May-2024
Total Views |

sbi bank
 
 
 
मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणाऱ्या एसबीआयचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. बँकेला ३१ मार्च २०२४ पर्यंत निव्वळ नफ्यात २४ टक्क्यांनी वाढ झालेली असून निव्वळ नफा २०६९८ कोटींवर पोहोचला आहे.मागील वर्षात हा नफा १६६९५ कोटी रुपयांवर गेला होता.
 
बँकेच्या व्याज उत्पन्नात १९ टक्क्यांनी वाढ होत १.११ लाख कोटींवर व्याज उत्पन्न पोहोचले आहे मागील वर्षात हे ९२९५१ लाख कोटी रुपये होते.तज्ञांनी बँकेला १३४०० कोटींचा निव्वळ नफा होऊ शकतो असे अनुमान व्यक्त केले होते त्याहून अधिक बँकेला नफा झाला आहे.
 
बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात ( NII) मध्ये ३.१ टक्क्यांनी वाढ होत ते उत्पन्न ४०३९२.५ कोटींहून वाढत ४१६५६ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या असेट क्लालिटीत देखील तुलनेने वाढ झाली आहे.बँकेच्या ग्रॉस एनपीए (Non Performing Assets) मध्ये २.९ टक्क्यांनी घट झाली असून निव्वळ एनपीएमध्ये ६.१ टक्क्यांनी घट झाली आहे.
 
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बँकेच्या एकूण उत्पन्नात १.२८ लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे जी गेल्या वर्षी १.०६ लाख कोटी होती. बँकेच्या ऑपरेटिंग खर्चात ३०२७५ कोटींपर्यंत वाढ झाली आहे जी गेल्या आर्थिक वर्षात २९७३२ कोटींवर होता.बँकेच्या अँडव्हान्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.तर तिमाही (QoQ) बेसिसवर ५ टक्क्यांनी वाढ झाली असून अँडव्हान्स ३७६७५३५ कोटीवर पोहोचले आहे.
 
बँकेच्या ठेवीत (Deposit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ११ टक्क्यांनी वाढ होत ४९१६०७७ कोटींवर पोहोचले आहे. घरगुती कासा (CASA) १९४१९९६ कोटीवर पोहोचला आहे. घरगुती मुदतठेवीत २७८२३४० कोटींवर पोहोचली आहे. आज शेअर बाजारात एसबीआयचा शेअर ३ टक्क्यांनी वाढत ८३४ रुपयांना बंद झाला होता. बँकेच्या संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर १३.७० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे आगामी भागभांडवल धारकांच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.