दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश-श्रेयससह कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

    09-May-2024
Total Views |
मल्याळम आणि हिंदी सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन
 

sivan  
 
मुंबई : हिंदीं चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन (Sangeeth Sivan) यांचे बुधवार दिनांक ८ मे रोजी रात्री निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सिवन यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सिवन (Sangeeth Sivan) यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत क्या कुल है हम, अपना सपना मनी मनी असे अनेक विनोदी चित्रपट दिग्दर्शित केले होते.
 
 
 
अभिनेता रितेश देशमुख याने सिवनचा यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. “संगीत सिवन सर राहिले नाहीत, या बातमीने मला खूप दुःख झाले. एक नवोदित अभिनेता म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली. क्या कूल हैं हम आणि अपना सपना मनी मनी चे दिवस मला अजूनही आठवतात. सिवन हे एक उत्तम माणूस आणि उत्तम व्यक्तिमत्व होते. या निधनाच्या वृत्ताने मला हादरवून सोडले आहे.' अशी पोस्ट लिहित रितेशने सिवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय अभिनेता श्रेयस तळपदेनेही पोस्ट करुन सिवन यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
 
 
 
अभिनेता सनी देओलने देखील संगीत सिवानच्या निधनावर शोक व्यक्त केला. सनी देओलने म्हटले की, “माझ्या प्रिय मित्राच्या निधनाची बातमी ऐकून विश्वास बसत नाही. पण तू नेहमी आमच्या हृदयात आणि आठवणींमध्ये राहशील”, अशी भावनिक पोस्ट संगीत सिवन यांच्या आठवणीत सनी देओलने केली आहे.
 
 
 
संगीत सिवन यांनी दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले होते. १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'व्यूहम्' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाची कारकिर्द सुरु केली होती. त्यानंतर 'योधा', 'गंधर्वम' आणि 'निर्णयम' हे मल्याळम तर 'चुरा लिया है तुमने', 'क्या कूल है हम', 'अपना सपना मनी मनी', ‘जोर’, असे अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले होते.