पवार हे ठाकरेंचे गाईड ते म्हणतील तसं उद्धव ठाकरे करतील!

देवेंद्र फडणवीसांचा उबाठा गटाला चिमटा

    09-May-2024
Total Views |

Pawar & Thackeray 
 
छत्रपती संभाजीनगर : शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे गाईड आहेत. ते म्हणतील तसंच उद्धव ठाकरे करतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
निवडणूकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. तसेच उद्धव ठाकरेंची विचारसरणीही आमच्यासारखीच आहे, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर उद्धव ठाकरेंना मी चांगलं ओळखतो ते काँग्रेसमध्ये जातील असं मला वाटत नाही, असं मत व्यक्त केलं होतं.
 
हे वाचलंत का? -  मविआला ३० ते ३५ जागा मिळतील : शरद पवार
 
यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "अजितदादा उद्धवजींना किती ओळखतात ते मला माहिती नाही. पण मी त्यांना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे तत्वज्ञानी आणि गाईड हे शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील," असे ते म्हणाले.
 
तसेच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "उद्धजींचा बॅलेन्स गेलेला आहे. त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ञाला दाखवावं आणि त्यांची मदत घ्यावी," असा सल्ला त्यांनी दिला.