१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात!

    09-May-2024
Total Views |
 
Amol Kirtikar
 
मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात मविआचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
 
अमित साटम म्हणाले की, "काल संध्याकाळी अंधेरी पश्चिम येथे १९९३ च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ रॅलीमध्ये फिरताना दिसला. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगची तर आहेच पण ही लढाई आता भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे. मुंबई के हत्यारों के साथ काँग्रेस का हाथ. महाविकास आघाडीचे उमेदवार मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवाद्यांचे समर्थन घेताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना जाळणारी मशाल कोणती हे आता ओळखण्याची गरज आहे," असे ते म्हणाले.