"ही लोकसभा निवडणुक 'विकासाला मत' विरुद्ध 'जिहादला मत' यांच्यातील आहे"

अमित शाह यांचा राहुल गांधींवर घणाघात

    09-May-2024
Total Views |
 amit shah
 
हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी तेलंगणातील भोंगीर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान अमित शाह म्हणाले की, "२०२४ ची निवडणूक ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे. ही निवडणुक विकालासा मत विरुद्घ जिहादला मत यांच्यातील लढाई आहे."
 
निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, ही निवडणूक काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'चीनी हमी' विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'भारतीय हमी' दरम्यान आहे. काँग्रेस, बीआरएस आणि एआयएमआयएम हे तुष्टीकरणाचा त्रिकोण असल्याची टीका करून ते म्हणाले की हे पक्ष रामनवमीची मिरवणूक काढू देत नाहीत आणि सीएएला विरोध करतात.
 
पुढे बोलताना गृहमंत्री म्हणाले की, "हे लोक हैदराबाद लिबरेशन डे' (१७ सप्टेंबर) साजरा करू देत नाहीत. हे लोक सीएए ला विरोध करतात. या लोकांना शरिया आणि कुराणच्या आधारे तेलंगण चालवायचे आहे." असा आरोपही अमित शाह यांनी केला. अमित शाहांनी या सभेत बोलताना अबकी बार चारशे पार जाण्याच्या भाजपच्या लक्ष्याचा पुनरुच्चार केला. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यात भाजपला सुमारे २०० जागा मिळतील, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.