पवार म्हणाले 'त्याला' मंत्रीपद मिळणार! अजितदादा म्हणतात, आमदारच कसा होतो ते बघतो!

    09-May-2024
Total Views |

Pawar's 
 
पुणे : शरद पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद देण्याबाबत असं वक्तव्य केलं होतं. यावर अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. तू आमदारच कसा होतो ते बघतो, असे ते म्हणाले आहेत. ते गुरुवारी शिरुरमधील आढळराव पाटलांच्या प्रचारसभेत बोलत होते.
 
"आंबेगाव जुन्नर आणि खेड या तिघांनीही रस्ता बदलला आहे. आता फक्त शिरुर राहिलं. ज्या पद्धतीने अशोक पवारांचं काम आहे त्यामुळे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी शिरुर मोकळं राहणार नाही," असं शरद पवार म्हणाले होते. यावरून अजित पवारांनी अशोक पवारांवर निशाणा साधला.
 
हे वाचलंत का? -  आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार असं लिहायला हवं : निरुपम
 
अजित पवार म्हणाले की, "अशोक पवार यांना साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळी तुच मंत्री होणार. त्याने कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पठ्ठ्या तू आमदारच कसा होतो ते बघतो. अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊ दिलं नाही. आता तु आमदारच कसा होतो ते बघतो," असं चॅलेंज त्यांनी दिलं.
  
ते पुढे म्हणाले की, "अशोक पवारांना घोडगंगा कारखाना चालवता आला नाही. मी कमी पडलो हे त्यांना सांगता येत नाही म्हणून ते माझ्या नावावर ढकलत आहेत. अरे तुझ्या अंगात दम नाही आणि माझं नाव काय घेतोस? त्यांच्याकडे मुद्दे राहिले नसल्याने ते आता काहीही बोलत आहेत. अमोल कोल्हे माझ्या शपथविधीला होता. मी शपथ घेतली, भूजबळांनी घेतली आणि दिलीप वळसे पाटलांनी शपथ घेतली. पण तिथे अशोक पवारांचं बिघडलं. ते म्हणाले यांचं आणि माझं जमत नाही दादांनी यांना घ्यायला नको होतं," असेही त्यांनी सांगितले.