मंदिरावर धर्मांधांचा हल्ला, मूर्त्यांची केली विटंबना; पूर्वनियोजित हल्ला असल्याचा आरोप

    09-May-2024
Total Views |

Ahmedabad Hindu Mandir

मुंबई (प्रतिनिधी) :
अहमदाबादच्या पिराना गावातील निष्कलंकी मंदिरावर (Ahmedabad Hindu Mandir) काही धर्मांधांनी हल्ला केल्याची घटना निदर्शनास आली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुस्लिम जमाव मंदिरावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे. विश्व हिंदू परिषदेने हा हल्ला पूर्वनियोजित असून हिंदू देवतांच्या अनेक मुर्त्यांची मोडतोड केल्याचेही म्हटले आहे.

निष्कलंकी मंदिर, प्रेरणापीठ या जागेसंदर्भात गेली अनेक वर्ष वाद सुरु होता. मंदिराच्या जागा ही दर्ग्याची असल्याचा दावा मुस्लिम पक्षाच्या वतीने होत आहे. तर ही जागा मंदिराचीच असल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. अशातच इथून काही कबरी हटवल्या गेल्याची अफवा पसरल्याने काही वेळातच धर्मांधांचा मोठा जमाव जमला आणि मंदिरात घुसून तोडफोड सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने मंदिर परिसरात पोहोचला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.