गुंतवणूकदारांचे बाजारात ६ लाख कोटींचे नुकसान ' या ' कारणांमुळे बाजारात स्थित्यंतरे

"विकण्याच्या दबावात " आल्याने बाजारात मोठ्या संख्येने घसरण

    09-May-2024
Total Views |
 
Stock Market
 
 
मुंबई: इक्विटी बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. बाजारातील कंसोलिडेशनच्या परिस्थितीतून संक्रमण करत असल्याने बाजारात अनेकांनी 'विकण्याच्या दबावात' आल्याने बाजारात मोठ्या संख्येने घसरण झाली आहे. एस अँड पी सेन्सेक्स १००० अंशाने घसरल्याने तसेच निफ्टी ५० हा निर्देशांक ३२१ पूर्णांकाने घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.निफ्टी आज २२००० पातळी खाली गेल्याने बेंचमार्क निर्देशांकात मोठी पडझड झाली आहे.
 
एकीकडे तिमाहीचे निकाल काही प्रमाणात निराशाजनक आले होते. बाजारातील तज्ञांच्या अंदाजापेक्षा कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात अथवा महसूलात प्रथमदर्शनी घट झाल्याने याचा परिणाम बाजारात झाला होता. दुसरीकडे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदारांनी अस्पष्ट चित्र असल्याने मोठी गुंतवणूक करण्यापासून ते परावृत्त होते.प्रामुख्याने VIX Volatility निर्देशांकात ५ टक्क्यांपर्यंत वाढ होत १७ टक्क्यांहून अधिक झाल्याने बाजारात प्रचंड उलथापालथ झाली होती.
 
या पडझडीचा प्रभाव बाजारात पडल्याने गुंतवणूकदारांना नुकसान होण्याबरोबरच कंपनीच्या बाजार भांडवलात मोठे नुकसान झाले आहे.आकडेवारीप्रमाणे कंपन्यांच्या बाजार भांडवलात आकडे खालावल्याने ४०० लाख कोटींचा खाली आकडेवारी जात हे ३९३.७३ कोटींवर आले होते.
 
एकीकडे तज्ञांच्या मते मोदी सत्तेवर परत येत असले तरी किती जागा भाजपला मिळतील हे अनिश्चित असल्याने बाजाराने सावधतेने पाऊले उचलली होती. याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांनी काल २८५४ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढल्याने एक पोकळी निर्माण झाली होती. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता घटल्याने तसेच अमेरिकेतील बेरोजगारीचे दर समोर आल्याने बाजारात नकारात्मक वलय कायम राहिले होते परिणामी बाजारात मोठी घसरण झाली आहे.