‘अग्नी’ चित्रपटात मराठी कलाकारांचा बोलबाला; ही मराठी अभिनेत्री करणार हिंदीत पदार्पण

    08-May-2024
Total Views |

agni  
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक मराठी कलाकारांचा बोलबाला अधिक दिसून येत आहे. आता हिंदीत मराठीतील आणखी एक चेहरा दिसणार आहे. अभिनेत्री सखी गोखले लवकरच बॉलिवूडमध्ये (Agni) पदार्पण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्नी या चित्रपटाची चर्चा असून याच चित्रपटातून सखी तिच्या हिंदीतील कामाला सुरुवात करणार आहे. अग्नी या चित्रपटात प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, देव्येंदू, सयामी खेर आणि सखी गोखलेही दिसणार आहेत.
 

agni
agni  
 
सखी गोखले म्हणाली की, " "अग्नी"चं चित्रीकरण करणं हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. अनेक मोठ्या कलाकारांच्या सोबतीने मला चित्रपटात काम करता आले. हा निव्वळ योगायोग होता म्हणून सेटवर आपली जवळची लोकं असल्यासारखं वाटलं. प्रतीक गांधी, सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत एकत्र येऊन काम करतानाचा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही. सगळ्यांच्या सोबतीने मी सुद्धा अग्नी साठी तितकीच उत्सुक आहे," असे मनोगत तिने मांडले.