ऋतुजा बागवेची हिंदीत एन्ट्री, झळकणार ‘या’ हिंदी मालिकेत!

    08-May-2024
Total Views |

rutuja  
 
 
मुंबई : मराठी असो किंवा हिंदी मालिकांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. मराठी कलाकार हिंदीतही मोठ्या प्रमाणात कामं करताना दिसत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) देखील हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असून तिच्या भूमिकेचे नाव ‘वैजू’ असणार आहे.
 

rutuja  
 
ऋतुजा बागवे हिने आत्तापर्यंत ‘नांदा सौख्य भरे’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यांसारख्या मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या. आता ती ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत ‘बिग बॉस’ फेम अंकित गुप्ता सोबत झळकणार आहे. या नव्या मालिकेविषयी मनोगत व्यक्त करताना ऋतुजा मटाशी बोलताना म्हणाली की, “मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक-सिनेमे करताना मला मालिकेत काम करायला पाहिजे असं नेहमी वाटायचं. पडद्यावर सतत दिसणं ही कलाकारांची गरज झालेली आहे. मालिका हे माध्यम कलाकाराला खूप काही देत असतं. मालिकाविश्व बाहेरुन सोपं वाटत असलं तरी, ते आम्हा कलाकारांसाठी खूपच आव्हानात्मक असतं. सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायल्या हव्यात. हे विचार सुरु असतानाच या मालिकेबद्दल विचारणा झाली”, असे ऋतुजा म्हणाली. नुकतीच ती लंडन मिसळ या मराठी चित्रपटात दिसली होती.