धक्कादायक! बोगस आधारकार्ड बनवून राहत होते ५० हजार घुसखोर!

    08-May-2024
Total Views |

ADHAR
 


थिरुवअनंतपुरम
: बोगस आधारकार्ड बनवून तब्बल ५० हजार घुसखोर केरळमध्ये राहत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, आसाममध्ये ही बनावट ओळखपत्रे तयार करुन त्या आधारे नवी ओळख निर्माण केली गेली, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. सुरक्षायंत्रणांच्या हवाल्याने ५० हजारहून अधिक विदेश घुसखोर केरळमध्ये राहत होते. बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंकेहून मोठ्या संख्येने हे अपराधी भारतात राहत होते. सैन्यदलातील गुप्तचर यंत्रणांनी या संदर्भातील अहवाल दिला आहे.
 
ऑनमनोरमाने दिलेल्या वृत्तानुसार, हे बनावट आधारकार्ड आसामच्या नगाव, मधुपुर, पश्चिम बंगाल आणि दिनाजपूर आणि नदीया या भागात तसेच केरळच्या पेरम्बवूरमध्ये आधारकार्ड केंद्र तयार करण्यात आली होती. या केंद्रांमध्ये छापेमारी करण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरांचे बोगस आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनीही यापूर्वीच अलर्ट दिला होता. त्यानंतर सीमा सुरक्षा बलाने आपली गस्त वाढविण्यास सुरुवात केली होती. तसेच कोस्ट गार्डनेही आपला तपास अधिक कडक केला आहे. मोठ्या प्रमाणावर एक रॅकेट झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. यात केरळचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यात आधारकार्ड पश्चिम बंगालहून चालविले जात आहे.
 
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये बोगस आधारकार्ड मोठ्या प्रमाणावर बनत चाललेले आहे. जिथे बाहेरून येणारे लोक काम करतात ते चुकीच्या माहितीद्वारे कार्ड बनवत आहेत. काही ठिकाणी फोटो बदलून आधारकार्ड तयार केली जात आहेत. यापूर्वीही अहवालात बाग्लादेशहून भारतात अवैध घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांची प्रकरणे उघडकीस आली आहेत. भारतात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची ओळख वापरुन हे घुसखोर देशात प्रवेश करतात. या प्रकरणाचा तपास एनआयए करत होती. तमिळनाडूत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.