१०० टक्के मतदान करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचा सन्मान

महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनचे मतदारांना आवाहन

    08-May-2024
Total Views |

hausing
मुंबई, दि.८ : प्रतिनिधी येत्या २० मे रोजी मुंबई आणि ठाणे लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. अधिकाधिक मतदारानी या प्रक्रियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक अयोग्य प्रयत्नशील आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व संचालकांनी सोसायटीच्या सभासदांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन १००% मतदान करून घेण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष, सोसायटी पदाधिकारी यांना बीएलओचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचा प्रत्येक सदस्य निवडणूक प्रकियेत सहभागी व्हावं, मतदान करावं, आपल्या सोसायटीचे १०० टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे.
राणे यांनी आवाहन करताना सांगितले की, आपल्या सोसायटीचे मतदान शंभर टक्के होण्यासाठी आवश्यक ते सर्व जनजागृतीपर उपक्रमण राबविण्यात यावे. यातून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करायचा आहे. मतदान कोणाला करतील, कोणत्या पक्षाला करतील याच्याशी आपला काहीही संबंध नाही. मात्र जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान व्हावं हा यामागचा हेतू आहे. ज्या सोसायटी शंभर टक्के मतदान करतील त्या सोसायटीचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. म्हणून सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या सोसायटीचे शम्भर टक्के मतदान होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.