संदेह नष्ट करणारे हरिभक्त

    08-May-2024
Total Views |

Ram Lala
 
आचार्य विनोबा भावे यांच्या मते, सत्संगतीचा सुयोग्य प्रभाव मानवी जीवनावर पडतो. परिणामतः सद्विचार हृदयापर्यंत पोहोचतात आणि परिवर्तन घडवून आणतात. रामाच्या निस्सीम भक्तांनी रामाचे काहीतरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ज्या रामभक्तांनी रामाला आपल्या हृदयात स्थापित केले आहे, अशा भक्तांचा सहवास मिळाला, तर मानवी जीवनाला आपल्या उद्धाराचा मार्ग सापडतो.
 
श्रीरामांचे गुणविशेष सांगून झाल्यावर लोकांनी या जानकीनायकाचा विवेक मनी धरावा, असे स्वामींनी सांगितले आहे. रामकथा या केवळ मनोरंजनासाठी नाहीत. त्यातील आशय आणि विवेक खूप काही शिकवणारे आहेत. स्वामी म्हणतात की, रामकथा ब्रह्माण्ड भेदून पैलाड न्यावी.’ रामकथेतील रामाच्या कृतीमागील विवेक समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो एक अभ्यासाचा विषय आहे. रामाच्या ठायी असलेला विवेक समजावा, यासाठी स्वामी आता त्याची उपयोजिता सांगत आहेत. स्वामींनी मागील श्लोक क्रमांक 132 मध्ये हा विवेक आचरणात आणण्यासाठी, ‘विचार करून मगच बोलावे’ व ‘प्रत्येक कृती साधक बाधक परिणामांचा विचार करून मग करावी’ असे मार्गदर्शन केले आहे.
 
क्रोधाच्या किंवा भावनेच्या आहारी जाऊन उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती यावर आपला ताबा नसतो. उलट अशा प्रसंगी अश्लाघ्य भाषा व अनुचित कृती यांनी आपल्या मनावर ताबा मिळवलेला असतो. त्यामुळे आपण नेहमी आपले आचार-उच्चार शुद्ध स्वरुपाचे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे स्वामींना वाटते. तथापि आपले बोलणे, आचरण शुद्ध ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही प्रसंगी आपला आपल्या विचारांवर ताबा राहात नाही. आपण अविवेकीपणे वागतो, बोलतो. ही आपल्यासारख्या सामान्य माणसाची नित्याची समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आपण ज्या वातावरणात वावरत असतो अथवा ज्या माणसांच्या सहवासात आनंद मानत असतो, त्यांचा, त्या वातावरणाचा काहीतरी परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यावर नकळत होत असतो. कालांतराने या परिस्थितीचा परिणाम वृत्तीवर होऊन आपल्याला निंदनीय भाषेचे व स्वैर वागण्याचे काही वाटेनासे होते. हे सर्व टाळायचे असेल, तर सुरुवातीपासून संगतीवर, वातावरणावर लक्ष दिले पाहिजे. सत्संगतीचे महत्त्व सार्‍या संतांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. स्वामीही आता या पुढील श्लोकांतून सत्संगतीवर बोलणार आहेत. श्लोक क्रमांक १३२ पासून पुढील तीन श्लोकांना आचार्य विनोबा भावे यांनी ’सत्संगतीने हृदयपरिवर्तन’ या शीर्षकाखाली आणले आहे.
 
आचार्य विनोबा भावे यांच्या मते, सत्संगतीचा सुयोग्य प्रभाव मानवी जीवनावर पडतो. परिणामतः सद्विचार हृदयापर्यंत पोहोचतात आणि परिवर्तन घडवून आणतात. रामाच्या निस्सीम भक्तांनी रामाचे काहीतरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ज्या रामभक्तांनी रामाला आपल्या हृदयात स्थापित केले आहे, अशा भक्तांचा सहवास मिळाला, तर मानवी जीवनाला आपल्या उद्धाराचा मार्ग सापडतो. हा आशय मनात ठेवून आता स्वामी तो पुढील श्लोकातून प्रगट करीत आहेत-
 
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी।
जेणें मानसीं स्थापिलें निश्वयासीं।
तथा दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे।
तथा भाषणें नष्ट संदेह मोडे॥133॥
 
भगवंताचे भक्त निष्ठापूर्वक भगवंतावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्या जवळ आध्यात्म अनुभवांचे ज्ञानाचे भांडार असते. भौतिक जगातील स्वार्थाचा, अहंकाराचा त्यांनी त्याग केलेला असतो. भगवंताच्या प्रेमानंदात संतुष्ट असल्याने भौतिक सुखदुःखाच्या बाबतीत ते विरक्त असतात. या भक्तांना मनातून भगवंताच्या अस्तित्वाची, त्याच्या निश्चिततेची जाणीव झालेली असते. शाश्वत भगवंताला त्यांनी जाणलेले असते. अशा प्रसन्नचित्त सत्पुरुषाचे नुसते दर्शन झाले, तरी पुण्य मिळाले असे वाटते. त्यांच्या दर्शनाप्रमाणे त्यांच्या स्पर्शाने आपला पुण्यसंचय वाढू लागतो. अशा सत्पुरुषांशी झालेल्या संभाषणाने आपल्या मनात पूर्वी देवाविषयी जे संशय, संभ्रम निर्माण झालेले असतात, ते नाहीसे होतात. सत्संगतीचा असा हा अद्भुत परिणाम दिसून येतो.
 
संत भगवंतावर निस्सीम प्रेम करतात. आपण त्या प्रेमाची कल्पना करू शकत नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांचे प्रेम भौतिक दृश्य वस्तूंवर आणि आवडत्या व्यक्तीवर असते. कवींनी अनेक प्रेमगीते लिहिलेली आहेत, लेखकांनी प्रेमकथा रचून प्रेमाविष्काराने सामान्य माणसांचे मनोरंजन केले आहे. तथापि, या अशाश्वत प्रेमाचे स्वरूप मर्यादित असते. परंतु, संतांच्या भगवंताविषयी शाश्वत प्रेमाची तर्‍हा निराळी असते. ते प्रेम निःस्वार्थी, निरपेक्ष असल्याने व्यावहारिक प्रेमसंबंधांच्या दृष्टान्ताने ते समजून घेता येत नाही.
 
ऐहिक जगतातील प्रेमाचा आधार अशाश्वत असल्याने मर्यादा येतात. तथापि भगवंताच्या प्रेमाचा अनुभव अतींद्रिय असल्याने त्याचे यथार्थ वर्णन करता येत नाही. कुठल्याही भौतिक प्रेमाशी तुलना होऊ शकत नाही. भगवंताच्या, शाश्वताच्या प्रेमात गुंतलेला भगवद्भक्त म्हणजे संत भेटणे कठीण असते. असा निष्ठावान भक्त, संत भेटला तरी त्याच्या बाह्यरूपाकडे पाहून त्याला ओळखता येत नाही. सर्वसामान्य माणसाला अतींद्रिय अनुभूती नसल्याने आत्मसाक्षात्कारी संताला ओळखणे कठीण जाते. आत्मसाक्षात्कारी संत सामान्य माणसाप्रमाणे दिसत असले, तरी त्यांच्या अंतरंगात किती भगवद्प्रेम आणि आध्यात्मिक शक्ती आहे, याचा आपण अंदाज करू शकत नाही. प्रचंड मानसिक शक्ती असल्याने त्यांचे शब्द, त्याची भाषा प्रभावी असते. त्यांच्या भाषेने, स्पर्शाने समोरच्या व्यक्तीच्या मनात स्पंदने उगम पावून तो भगवद्प्रेमाकडे वळतो आणि अतींद्रिय अनुभूतीचा प्रत्यय घेऊ शकतो. सामान्य माणसे इंद्रियाधीन असल्याने त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यात सारखे बदल होत जातात- भगवंताच्या अस्तित्वाबद्दल त्यांची निश्चिसंदेह नष्ट करणारे हरिभक्त 
 
आचार्य विनोबा भावे यांच्या मते, सत्संगतीचा सुयोग्य प्रभाव मानवी जीवनावर पडतो. परिणामतः सद्विचार हृदयापर्यंत पोहोचतात आणि परिवर्तन घडवून आणतात. रामाच्या निस्सीम भक्तांनी रामाचे काहीतरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ज्या रामभक्तांनी रामाला आपल्या हृदयात स्थापित केले आहे, अशा भक्तांचा सहवास मिळाला, तर मानवी जीवनाला आपल्या उद्धाराचा मार्ग सापडतो.
 
श्रीरामांचे गुणविशेष सांगून झाल्यावर लोकांनी या जानकीनायकाचा विवेक मनी धरावा, असे स्वामींनी सांगितले आहे. रामकथा या केवळ मनोरंजनासाठी नाहीत. त्यातील आशय आणि विवेक खूप काही शिकवणारे आहेत. स्वामी म्हणतात की, रामकथा ब्रह्माण्ड भेदून पैलाड न्यावी.’ रामकथेतील रामाच्या कृतीमागील विवेक समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो एक अभ्यासाचा विषय आहे. रामाच्या ठायी असलेला विवेक समजावा, यासाठी स्वामी आता त्याची उपयोजिता सांगत आहेत. स्वामींनी मागील श्लोक क्रमांक 132 मध्ये हा विवेक आचरणात आणण्यासाठी, ‘विचार करून मगच बोलावे’ व ‘प्रत्येक कृती साधक बाधक परिणामांचा विचार करून मग करावी’ असे मार्गदर्शन केले आहे. क्रोधाच्या किंवा भावनेच्या आहारी जाऊन उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती यावर आपला ताबा नसतो. उलट अशा प्रसंगी अश्लाघ्य भाषा व अनुचित कृती यांनी आपल्या मनावर ताबा मिळवलेला असतो.
 
त्यामुळे आपण नेहमी आपले आचार-उच्चार शुद्ध स्वरुपाचे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे स्वामींना वाटते. तथापि आपले बोलणे, आचरण शुद्ध ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही प्रसंगी आपला आपल्या विचारांवर ताबा राहात नाही. आपण अविवेकीपणे वागतो, बोलतो. ही आपल्यासारख्या सामान्य माणसाची नित्याची समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आपण ज्या वातावरणात वावरत असतो अथवा ज्या माणसांच्या सहवासात आनंद मानत असतो, त्यांचा, त्या वातावरणाचा काहीतरी परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यावर नकळत होत असतो. कालांतराने या परिस्थितीचा परिणाम वृत्तीवर होऊन आपल्याला निंदनीय भाषेचे व स्वैर वागण्याचे काही वाटेनासे होते. हे सर्व टाळायचे असेल, तर सुरुवातीपासून संगतीवर, वातावरणावर लक्ष दिले पाहिजे. सत्संगतीचे महत्त्व सार्‍या संतांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. स्वामीही आता या पुढील श्लोकांतून सत्संगतीवर बोलणार आहेत. श्लोक क्रमांक 132 पासून पुढील तीन श्लोकांना आचार्य विनोबा भावे यांनी ’सत्संगतीने हृदयपरिवर्तन’ या शीर्षकाखाली आणले आहे.
 
आचार्य विनोबा भावे यांच्या मते, सत्संगतीचा सुयोग्य प्रभाव मानवी जीवनावर पडतो. परिणामतः सद्विचार हृदयापर्यंत पोहोचतात आणि परिवर्तन घडवून आणतात. रामाच्या निस्सीम भक्तांनी रामाचे काहीतरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ज्या रामभक्तांनी रामाला आपल्या हृदयात स्थापित केले आहे, अशा भक्तांचा सहवास मिळाला, तर मानवी जीवनाला आपल्या उद्धाराचा मार्ग सापडतो. हा आशय मनात ठेवून आता स्वामी तो पुढील श्लोकातून प्रगट करीत आहेत-
 
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी।
जेणें मानसीं स्थापिलें निश्वयासीं।
तथा दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे।
तथा भाषणें नष्ट संदेह मोडे॥133॥
 
भगवंताचे भक्त निष्ठापूर्वक भगवंतावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्या जवळ आध्यात्म अनुभवांचे ज्ञानाचे भांडार असते. भौतिक जगातील स्वार्थाचा, अहंकाराचा त्यांनी त्याग केलेला असतो. भगवंताच्या प्रेमानंदात संतुष्ट असल्याने भौतिक सुखदुःखाच्या बाबतीत ते विरक्त असतात. या भक्तांना मनातून भगवंताच्या अस्तित्वाची, त्याच्या निश्चिततेची जाणीव झालेली असते. शाश्वत भगवंताला त्यांनी जाणलेले असते. अशा प्रसन्नचित्त सत्पुरुषाचे नुसते दर्शन झाले, तरी पुण्य मिळाले असे वाटते. त्यांच्या दर्शनाप्रमाणे त्यांच्या स्पर्शाने आपला पुण्यसंचय वाढू लागतो. अशा सत्पुरुषांशी झालेल्या संभाषणाने आपल्या मनात पूर्वी देवाविषयी जे संशय, संभ्रम निर्माण झालेले असतात, ते नाहीसे होतात. सत्संगतीचा असा हा अद्भुत परिणाम दिसून येतो.
 
संत भगवंतावर निस्सीम प्रेम करतात. आपण त्या प्रेमाची कल्पना करू शकत नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांचे प्रेम भौतिक दृश्य वस्तूंवर आणि आवडत्या व्यक्तीवर असते. कवींनी अनेक प्रेमगीते लिहिलेली आहेत, लेखकांनी प्रेमकथा रचून प्रेमाविष्काराने सामान्य माणसांचे मनोरंजन केले आहे. तथापि, या अशाश्वत प्रेमाचे स्वरूप मर्यादित असते. परंतु, संतांच्या भगवंताविषयी शाश्वत प्रेमाची तर्‍हा निराळी असते. ते प्रेम निःस्वार्थी, निरपेक्ष असल्याने व्यावहारिक प्रेमसंबंधांच्या दृष्टान्ताने ते समजून घेता येत नाही.
 
ऐहिक जगतातील प्रेमाचा आधार अशाश्वत असल्याने मर्यादा येतात. तथापि भगवंताच्या प्रेमाचा अनुभव अतींद्रिय असल्याने त्याचे यथार्थ वर्णन करता येत नाही. कुठल्याही भौतिक प्रेमाशी तुलना होऊ शकत नाही. भगवंताच्या, शाश्वताच्या प्रेमात गुंतलेला भगवद्भक्त म्हणजे संत भेटणे कठीण असते. असा निष्ठावान भक्त, संत भेटला तरी त्याच्या बाह्यरूपाकडे पाहून त्याला ओळखता येत नाही. सर्वसामान्य माणसाला अतींद्रिय अनुभूती नसल्याने आत्मसाक्षात्कारी संताला ओळखणे कठीण जाते. आत्मसाक्षात्कारी संत सामान्य माणसाप्रमाणे दिसत असले, तरी त्यांच्या अंतरंगात किती भगवद्प्रेम आणि आध्यात्मिक शक्ती आहे, याचा आपण अंदाज करू शकत नाही.
 
प्रचंड मानसिक शक्ती असल्याने त्यांचे शब्द, त्याची भाषा प्रभावी असते. त्यांच्या भाषेने, स्पर्शाने समोरच्या व्यक्तीच्या मनात स्पंदने उगम पावून तो भगवद्प्रेमाकडे वळतो आणि अतींद्रिय अनुभूतीचा प्रत्यय घेऊ शकतो. सामान्य माणसे इंद्रियाधीन असल्याने त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यात सारखे बदल होत जातात- भगवंताच्या अस्तित्वाबद्दल त्यांची निश्चितता नसते. तर्कशास्त्राच्या आधारे बुद्धीने परमेश्वराला जाणता येत नाही. भगवंताला जाणण्यासाठी अतींद्रिय अनुभूतीची आवश्यकता असते. संतानी ती अनुभूती आपल्या साधनेतून निष्ठेने प्राप्त करून घेतलेली असते.
 
जगातील अशाश्वत गोष्टींवर आपले प्रेम असते, तसे प्रेम अंतर्मुख होऊन संत शाश्वत भगवंतावर करतात व अतींद्रिय अनुभूतीतून ईशतत्त्वाशी एकरूप होऊन जातात. याचे थोडक्यात वर्णन करताना प्रा. के. वि. बेलसरे म्हणतात, “जसे आपण दृश्य वस्तू पाहातो तसे संत अदृश्य आत्मवस्तू साक्षात अनुभवतात. आपण दृश्य वस्तूबद्दल जशी निश्चिती बाळगतो, तशी संत आत्मवस्तूबद्दल बाळगतात.” अशा संतांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने पुण्य प्राप्त होते. त्यांच्या संभाषणातून आपले संशय, संदेह, संभ्रम दूर होतात, हा महत्त्वाचा सिद्धांत स्वामींनी या श्लोकाच्या शेवटी सांगितला आहे.
 
तर्कशास्त्राच्या आधारे बुद्धीने परमेश्वराला जाणता येत नाही. भगवंताला जाणण्यासाठी अतींद्रिय अनुभूतीची आवश्यकता असते. संतानी ती अनुभूती आपल्या साधनेतून निष्ठेने प्राप्त करून घेतलेली असते. जगातील अशाश्वत गोष्टींवर आपले प्रेम असते, तसे प्रेम अंतर्मुख होऊन संत शाश्वत भगवंतावर करतात व अतींद्रिय अनुभूतीतून ईशतत्त्वाशी एकरूप होऊन जातात. याचे थोडक्यात वर्णन करताना प्रा. के. वि. बेलसरे म्हणतात, “जसे आपण दृश्य वस्तू पाहातो तसे संत अदृश्य आत्मवस्तू साक्षात अनुभवतात. आपण दृश्य वस्तूबद्दल जशी निश्चिती बाळगतो, तशी संत आत्मवस्तूबद्दल बाळगतात.” अशा संतांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने पुण्य प्राप्त होते. त्यांच्या संभाषणातून आपले संशय, संदेह, संभ्रम दूर होतात, हा महत्त्वाचा सिद्धांत स्वामींनी या श्लोकाच्या शेवटी सांगितला आहे.
 
सुरेश जाखडी