उद्धव ठाकरेंची 'सामना'ला मुलाखत! 'या' दिवशी होणार प्रकाशित

    08-May-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राला मुलाखत देणार आहे. सविस्तर मुलाखत रविवारी आणि सोमवारी दोन भागात प्रकाशित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायूतीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला ठाकरे या मुलाखतीतून प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.
 
याआधीही उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबत एक पॉडकास्ट केला होता. त्यावेळी या पॉडकास्टला किती प्रतिसाद मिळाला हे सर्वांना ठाऊकच आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सामनाला मुलाखत देणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळात ठाकरे ही मुलाखत देणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीत ठाकरे काय बोलतात आणि त्याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.