परवीन शेख प्रकरण : सोमय्या ट्रस्टला काँग्रेस नेत्याची धमकी

    08-May-2024
Total Views |

मुंबई (प्रतिनिधी)
: सोमय्या विद्याविहार शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख (Parveen Shaikh) यांना अखेर सोमय्या ट्रस्टकडून निलंबित करण्यात आले. मंगळवार, दि. ०७ मे रोजी ट्रस्टने यासंदर्भात जाहीरपणे निवेदन जारी करत मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी एका काँग्रेस नेत्याने थेट सोमय्या ट्रस्टला धमकी दिल्याचे निदर्शनास आले आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यास तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत काँग्रेस नेते मॅथ्यू अँटनी यांनी धमकवल्याचे दिसते आहे.

हे वाचलंत का? : अखेर परवीन शेखना सोमय्या ट्रस्टचा दणका!


त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सोमय्या शाळेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. मी मुख्याध्यापिका परवीन शेख यांच्याशी बोललो आहे आणि सोमय्या ट्रस्टला विनंती केली आहे की त्यांनी बाजू घेण्याच्या राजकीय सापळ्यापासून दूर राहावे आणि पक्षपात करू नये."