मुंबई विमानतळाच्या धावपट्टी उद्या तात्पुरत्या बंद

एकही विमान उड्डाण घेणार नाही

    08-May-2024
Total Views |

airport
मुंबई, दि.८: प्रतिनिधी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि देशांतर्गत विमानतळाच्या धावपट्टी पूर्णपणे बंद राहणार आहेत. गुरुवार, दि.९ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा सुरू होणार नाही. या दिवशी मुंबईच्या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीवर पावसाळा आणि नियमित देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत हवाई प्रवासी कोणतीही उड्डाणे घेऊ शकणार नाहीत.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या प्रसिद्धीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मान्सूनच्या तयारीच्या धोरणानुसार, प्राथमिक धावपट्टी ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ या गुरुवार दि. ९ मे यादिवशी तात्पुरती बंद राहील. याबाबत अधिक माहिती अशी आहे की, एअरलाइन कंपन्या आणि इतर भागधारकांना डिसेंबर २०२३ मध्येच याबाबत माहिती देण्यात आली होती. जेणेकरून उड्डाणाचे वेळापत्रक त्यानुसार बनवले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, देखभालीच्या कामाचा उड्डाण वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही जारी करण्यात आली आहे. तसेच ही योजना प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर देखील केंद्रित आहे. कारण पावसाळ्यात लँडिंग आणि टेक-ऑफमध्ये पाणी साचल्यामुळे आणि अशा इतर समस्यांमुळे अडथळे येऊ शकतात.
मुंबई विमानतळ सुमारे १०३३ एकरमध्ये पसरलेले आहे. मुंबई विमानतळावर धावपट्टी, टॅक्सी वे आणि ऍप्रनसाठी पायाभूत सुविधांचे मोठे जाळे आहे. वार्षिक देखभाल दिनचर्यामध्ये दैनंदिन फ्लाइट ऑपरेशन्सच्या परिणामी लहान आणि मोठ्या टेक्सचरचे मूल्यांकन करण्यासाठी धावपट्टीच्या पृष्ठभागाची काळजीपूर्वक तपासणी समाविष्ट असते.