१४ वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार; आरोपी इब्राहिम खानवर गुन्हा दाखल

    08-May-2024
Total Views |

Mira Road News

मुंबई (प्रतिनिधी) :
मीरारोडच्या काशीगाव (Mira Road News) येथील एका १४ वर्षीय हिंदू मुलीवर क्रूरपणे बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी इब्राहिम खान नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने पीडितेने इब्राहिम खानशी संपर्क ठेवणे कमी केले होते.

हे वाचलंत का? : अखेर परवीन शेखना सोमय्या ट्रस्टचा दणका!

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीसोबत राहात होती. आरोपी इब्राहिम खान पीडितेच्या शेजारीच राहत होता. आरोपीने पीडितेशी संपर्क साधला आणि तो तिला आवडतो व त्याला तिच्यासोबत आयुष्य घालवायचे असल्याचे सांगितले. त्याने मुलीला लग्नासाठी मागणीसुद्धा घातली. मात्र मुलीला प्रतिसाद द्यायला थोडा वेळ लागल्याने ती घरात एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिचा छळ केला. नंतर त्याने मुलीवर बळजबरीही केली. जर ती त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकली नाही तर तो तिला ठार मारेल, अशी धमकीसुद्धा त्याने दिली होती.

तरी आता यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ३७६, आणि ३७६(३) अंतर्गत व पॉस्को कायद्याच्या कलम ४ आणि ८ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्याचप्रमाणे इब्राहिम खान विरोधात एससी/एसटी कायदा, १९८९ चे 3(1)(w)(i) आणि 3(1)(w)(ii) कलमही लावण्यात आले आहेत. सध्या पोलिकांचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.