गुंतवणूकीत परतावा महत्वाचा जाणून घ्या मे मध्ये कुठल्या स्मॉल फायनान्स बँकेत किती व्याजदर...

ग्राहकांसाठी स्मॉल फायनान्स बँकाचे आकर्षक व्याजदर

    08-May-2024
Total Views |

Interest Rate
 

मुंबई: गुंतवणूक ही सर्वांसाठी महत्वाची असते त्यातून मिळणारा परतावा भविष्यातील योजनांसाठी फायदेशीर ठरतो. बाजारात अनेक आर्थिक उत्पादने व साधने गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. बाजारातील फायदे नुकसान वैयक्तिक गरज व नियोजन या सगळ्या कसोटीवर उतरणारा आर्थिक लाभ घेणे सोयीस्कर ठरते.
 
सध्या मुख्य व्यवसायिक बँका व स्मॉल फायनान्स बँक व विना बँकिग वित्तीय संस्था यांमध्ये ठेवी अथवा मुदत ठेवी ठेवल्यास त्याचा आपल्याला परतावा मिळतो‌. यामध्ये विविध बँकांचा समावेश आहे. एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रत्येक बँकेच्या ठेवीवरील व्याजदर वेगळा असतो. कुठल्या बँकेत मुदत ठेव असल्यास किती व्याज मिळू शकते हे जाणून घेऊयात....
 
- युनिटी स्मॉल फायनान्स बँक - ९ टक्के व्याजदर ज्येष्ठ नागरिक ९.५ %
 -नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक - ९.२५ %
-सूर्योदय बँक - ९.१ टक्के व ज्येष्ठ नागरिक - ९.१ %
-शिवालिक स्मॉल फायनान्स बँक - ९ %
-इक्विटास स्मॉल फायनान्स बँक - ९ %
-जन स्मॉल फायनान्स बँक - ९ %
 
 
मे महिन्यातील व्याजदर -
 
युनिटी स्मॉल फायनान्स बँक - ४.५० ते ९ टक्के - सामान्य ४.५ ते ९. ५ - ज्येष्ठ नागरिक
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक - ३ ते ८.५ - सामान्य, ३.७५ ते ९.२५ - ज्येष्ठ नागरिक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक - सामान्य - ४.५ ते ८.६५ टक्के, ज्येष्ठ नागरिक -४.५ ते ९.१ टक्के
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक - सामान्य -४ ते ८.५० टक्के, ज्येष्ठ नागरिक -४.७५ -९.१ टक्के
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक - सामान्य -३.५ ते ८.५५ टक्के ज्येष्ठ नागरिक - ४ टक्के ते ९.०५ टक्के
जन स्मॉल फायनान्स बँक - सामान्य - ३ ते ८.५ टक्के ज्येष्ठ नागरिक - ३.५ ते ९ टक्के
उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक - सामान्य ३.७५ ते ८.५ टक्के ज्येष्ठ नागरिक -४.२५ ते ९ टक्के
एसबीएम बँक - सामान्य - ४.२५ ते ८.२५ टक्के ज्येष्ठ नागरिक - ४.७५ ते ८.७५ टक्के