चलन तरलता वाढवण्यासाठी आरबीआयचा महत्वपूर्ण निर्णय

एप्रिलपासून १.७ लाख कोटींची आरबीआयने बाजारात गुंतवणूक केली

    08-May-2024
Total Views |

RBI
 
 
मुंबई: ६ आठवडे चालत असलेल्या भारतीय लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात चलनाच्या तरलतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चलनातील तरलता (Liquidty) वाढवण्यासाठी आरबीआयने काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे ठरवले आहेत. १९ तारखेला निवडणूक सुरू झाली असून अंतिम निकाल जून १ ला लागणार आहेत. मधल्या काळात तरलतेचा प्रश्न मिटवण्यासाठी आरबीआयने बाँड पुन्हा खरेदी करण्याचे ठरवले आहेत.
 
या बाँडची किंमत ४०००० कोटी असणार आहे. आरबीआयने हे बाँड पुन्हा खरेदी (Buyback) केल्यानंतर बाजारात चलन पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. दोन ते पाच वर्षांत मुदत संपलेल्या बाँडवर मिळणारे यील्ड हे ३ ते ५ बेसिस पूर्णांकाने असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
 
एप्रिल महिन्यापासून भारतातील तरलतेत घट निर्माण झाली आहे. बाजारातील चलन पुरवठा कमी झाल्याने बाजारात अडचणी येऊ शकतात त्याचा सामना करण्यासाठी बँकेने हे निर्णय घेतले. एप्रिल मध्यानंतर आरबीआयने व्यवस्थेत Variable Rate Repo मध्ये १.७ लाख कोटींची गुंतवणूक केली होती असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. निवडणूक काळात सरकारचा चलनावर अवलंबून असलेला खर्च कमी झाल्याने ही चलनाची कमतरता होत होती जी आरबीआयने कमी करण्याचे ठरवले होते.