विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर!

    08-May-2024
Total Views |
  
Election
 
मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणूकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यानंतर लगेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
 
१० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे :
 
१५ मे - उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार
 
२२ मे - उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
 
२४ मे - अर्जांची छाणणी
 
२७ मे - अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
 
१० जून - मतदान
 
१३ जून - मतमोजणी