गौरव मोरेचा महाराष्ट्राची हास्यजत्रेला अखेर रामराम; पोस्ट करत मागितली माफी

    08-May-2024
Total Views |
अभिनेता गौरव मोरेचे आगामी बरेच चित्रपट भेटीला येणार असून तुर्तास त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून विराम घेतला आहे.
 

gaurav  
 
मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Gaurav More) या कार्यक्रमाचे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच चाहते आहेत. यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पण या कार्यक्रमातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून अभिनेता गौरव मोरेला (Gaurav More) ओळखले जाते. पण आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला गौरव मोरेने राम राम केला आहे. सध्या तो मॅडनेस मचायेंगे इंडिया को हसायेंगे या हिंदी कॉमेडी शो मध्ये दिसत आहे.
 
काय आहे गौरवची पोस्ट?
 
गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोच्या सेटचा व्हिडिओ शेअर करत तो हा शो सोडत असल्याची घोषणा केली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना गौरवने हृदयस्पर्शी कॅप्शन दिले. नमस्कार! मी गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा…
Ta na na na na naaaaaa
आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……
रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं, सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत…मला सांगताना खूप वाईट वाटतंय की, मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो.
 

gaurav  
 
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो.. माध्यमसारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील! असं म्हणतात ना… नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे!
 
दरम्यान, गौरव मोरे लवकरच महापरिनिर्वाण या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय सध्या तो हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये दिसत असून त्याच्यासोबत कुशल बद्रिके, हेमांगी कवी हे मराठी कलाकार सुद्धा झळकत आहेत.