कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट प्रति बॅरेल ' ही' किंमत

जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात १.५० टक्क्यांपर्यंत घसरण

    08-May-2024
Total Views |

Crude Oil
 

मुंबई: अमेरिकन बाजारातील आकडेवारीनुसार ' क्रूड ' (कच्च्या) तेलाच्या साठा मुबलक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कालपर्यंत क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती मात्र आज क्रूड तेलाच्या निर्देशांकात घट झाल्याने बाजारात तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
 
WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात दुपारपर्यंत १.३० टक्क्यांनी घसरण झाली असून Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात दुपारपर्यंत १.२४ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये क्रूड तेलाच्या निर्देशांकात १.६७ टक्क्यांनी घसरण होत प्रति बॅरेल तेलाची किंमत ६४७५.०० रुपये झाली आहे.
 
बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने भारतीय बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कालपर्यंत सौदी अरेबियाने आशियाई बाजारातील क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ केल्याने भारतात भाव वाढ झाली होती परंतु मध्यपूर्वेतील सावरलेली परिस्थिती व मुबलक तेलाचा साठा यामुळे परिस्थिती आटोक्यात आल्याने कच्चे तेल स्वस्त झाले आहे.