प्रकल्प पूर्ण करण्यात गेल्या १० वर्षात सर्वाधिक वाढ १५० कोटीत यावर्षी ' इतके ' प्रकल्प पूर्ण

आर्थिक वर्षात काही प्रकल्पात ज्यादा खर्च वाढला

    07-May-2024
Total Views |

Projects
 
 
मुंबई: सरकारने दिलेल्या निवेदनानुसार, सरकारने आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये १५० कोटी खर्चात २८१ प्रकल्प पूर्ण केल्याचे म्हटले आहे. गेल्या दशकभरात ही प्रकल्प पूर्तीचा सर्वाधिक असल्याचे सरकारने म्हटले आहे. मागील महिन्यातील ४१.२ टक्क्यांचा तुलनेत या महिन्यात ४१.६ प्रकल्प अपुरे राहिले आहेत.
 
७९९ प्रकल्पातील ५१ टक्के प्रकल्प प्रलंबित झाल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे. तर दोन वर्षांत यातील ५१ टक्के प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत. प्रकल्पाच्या खर्चात इयर बेसिसवर १८.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे जी मागील महिन्यात १८.१९ टक्के होती. सरकारी आकडेवारीनुसार मार्चमध्ये दोन रस्ते प्रकल्प, एक टेलिकॉम प्रकल्प, तसेच २३ अधिकचे रस्ते प्रकल्प, २३ पेट्रोलियम, २ उर्जा एवढे प्रकल्प मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आले आहेत. अहवालात म्हटल्याप्रमाणे, संपूर्ण किंमती अजून प्रकल्प संस्थेनी दिली नसल्याने आकडेवारीत बदल होऊ शकतो.
 
रेल्वे प्रकल्पात सर्वाधिक अधिकचा खर्च वाढला असून १४९ रेल्वे प्रकल्पात खर्च वाढला आहे.तर पाणी प्रकल्पातील ४१ पैकी ९ प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. पाच रस्ते प्रकल्पातील खर्चात वाढ झाली आहे. परंतु गेल्या दशकभरातील प्रकल्प पूर्ण करण्याच्या वेगात यंदा सर्वाधिक वाढ झाली आहे.