शेअर बाजार अपडेट: बँक निर्देशांकात घसरण कायम ! सेन्सेक्स ४१४.८४ घसरत ७३४८०.७० पातळीवर, निफ्टी १३५.१५ अंशाने घसरत २२३०७.५५ पातळीवर

07 May 2024 11:23:16

Stock Market
 
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज घसरण झाली आहे. कालच्या थोड्या वाढीनंतरही बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाले होते परिणामी वाढ झाली असली तरी मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली होती. आज बाजारात सेन्सेक्स निर्देशांकात ४१४.८४ अंशाने घसरण होत सेन्सेक्स ७३४८०.७० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १३५.१५ अंशाने घसरत २२३०७.५५ पातळीवर पोहोचला आहे.
 
एस अँड पी सेन्सेक्स बँक निर्देशांकात ५६९.४० अंशाने घट होत ५४९६४.९६ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ५०९.५० अंशाने घसरण होत ४८३८५.८० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे १.३ व १.४ टक्क्यांनी घसरण झाल्याने बाजारात ओसरती सुरूवात झाली असे म्हणता येईल.बँक निर्देशांकातील आजही घसरण कायम असून पीएसयु बँकांच्या समभागात काय हालचाल होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
बीएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये १.१२ व १.०४ टक्क्यांनी अनुक्रमे घसरण झाली आहे तर एनएसईत ०.९९ व ०.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. एनएसईत केवळ एफएमसीजी (२.७०%) समभागात वाढ झाली असून बाकी सगळ्या समभागात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. मिडस्मॉल हेल्थकेअर (१.६१%) समभागात झाली असून मेटल (१.२५%) फार्मा (१.१५%) पीएसयू बँक (१.२१%) हेल्थकेअर (१.१९%) समभागात झाली आहे.
 
मध्यपूर्वेतील हमास इस्त्राईल संघर्षातील गाझा येथे वाढलेला तणाव, सौदी अरेबियाने कालपासून आशिया खंडातील कच्च्या (क्रूड) तेलाच्या किंमतीत वाढ केल्याने तसेच ओपेक देशांनी क्रूड तेलाच्या उत्पादनात घट केल्याने आजही क्रूड तेलाच्या निर्देशांकात वाढ सकाळपर्यंत कायम राहिली आहे. भारतीय रुपया ४ पैशाने वाढत ८३.४८. प्रति १ डॉलरवर पोहोचला आहे.
 
बीएसईत एचयुएल, नेस्ले, आयटीसी, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेंटस, टीसीएस, लार्सन या समभागात वाढ झाली असून पॉवर ग्रीड, जेएसडब्लू स्टील, एचसीएलटेक, इंडसइंड बँक, एनटीपीसी, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, रिलायन्स, एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, मारूती सुझुकी, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टायटन कंपनी, बजाज फायनान्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, सनफार्मा या समभागात घट झाली आहे.
 
एनएसईत एचयुएल, ब्रिटानिया, नेस्ले, आयटीसी, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, कोटक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, टीसीएस,टेक महिंद्रा, टेक महिंद्रा, कोल इंडिया, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, लार्सन, एशियन पेंटस, बजाज फिनसर्व्ह, बीसीसीएल या समभागात वाढ झाली असून जेएसडब्लू स्टील, पॉवर ग्रीड, बजाज ऑटो, सिप्ला, श्रीराम फायनान्स, हिंदाल्को, इंडसइंड बँक, एचसीएलटेक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, मारूती, ओएनजीसी, डिवीज, एम अँड एम, टाटा स्टील, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट,अदानी पोर्टस, मारूती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, एक्सिस बँक, टायटन कंपनी, ग्रासीम, विप्रो, एचडीएफसी बँक, अदानी एंटरप्राईज, भारती एअरटेल, सनफार्मा, बजाज फायनान्स, एशियन पेंटस, बीपीसीएल या समभागात घट झाली आहे.
 
आज निरिक्षणासाठी महत्वाचे शेअर्स कुठले ? -
 
गोदरेज कनज्यूमर प्रोडक्ट, गुजरात गॅस, मुथूट मायक्रोफिन, मर्केटाईल बँक, लुपिन
 
Powered By Sangraha 9.0