बॉक्स ऑफिसवर महिलाराज, 'नाच गं घुमा'ने केली बक्कळ कमाई

07 May 2024 17:47:18

nach ga ghuma 
 
 
मुंबई : स्त्री प्रधान चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे खेचून घेतले आहे. झिम्मा, बाईपण भारी देवा आणि आता अलीकडे प्रदर्शित झालेल्या नाच गं घुमा या चित्रपटानेही स्त्री वर्ग पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे आणला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) या चित्रपटात मोलकरीण आणि वर्किंग वुमन यांच्यातील नातेसंबंध, त्यांच्या अडचणींवर भाष्य करण्यात आले आहे. ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) चित्रपट बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई करताना दिसत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ८.३८ कोटी कमावले आहेत.
 
स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी निर्मित नाच गं घुमा या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव या प्रमुख भूमिकेत असून मायरा वायकूळ, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे यांच्या देखील महत्वपुर्ण भूमिका आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0